शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पुण्यात निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबावर १ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा; नाव खराब करण्यासाठी केला खोटा गुन्हा दाखल, कुटुंबीयांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:39 IST

खोटा व बनावट दस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केली आहे.

पुणे : मिळकत अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने गहाण खत करुन ते तारण ठेवून त्याद्वारे सारस अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीतून १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज करुन त्याचे हप्ते न भरता फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबासह ६ जणांवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सचिन दत्तात्रय टेमघरे (वय ४०), अमोल दत्तात्रय टेमघरे (वय ३९), मनोज दत्तात्रय टेमघरे, मंगला दत्तात्रय टेमघरे (सर्व रा. इंद्रधनु सोसायटी, कोथरुड), भगवान विठोबा बराटे (रा. कृष्णकुुंज), गणेश भागोजी कराळे (वय ५४) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेकडून अगोदर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी न्यायालयाने कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. ही हद्द वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वारजे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाची स्थगिती उठविल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सारस अर्बन को ऑ क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी नितीन जोरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १३ एप्रिल २०१४ पासून सुरु झाली आहे. सचिन, अमोल, मनोज आणि मंगला टेमघरे यांनी सारस अर्बनकडे वारजे गट क्ऱ ७३ हिस्सा नं. १ क्षेत्र ९५० चौमी ही स्वत:चे मालकीची जमीन गहाण खताद्वारे संस्थेला लिहून दिली. त्यावर संस्थेकडून १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज काढले. सुरुवातीला कर्जाचे हप्ते भरले. नंतर हप्ते भरणे बंद केल्यामुळे जोरकर यांनी या मिळकतीवर कारवाई सुरु केली असता ही मिळकत अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. सखोली चौकशी केली असताना टेमघरे कुटुंबातील चारही आरोपींनी भगवान बराटे आणि गणेश कराळे या दोघांशी संगनमत करुन खोटा व बनावट दस्त तयार करुन तो खरा असल्याचे भासवून संस्थेची फसवणूक केली आहे.

नाव खराब करण्यासाठी केला खोटा गुन्हा दाखल

याबाबत टेमघरे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले की, रीतसर जमीन तारण ठेऊन टेमघरे कुटुंबीयांनी १ कोटी २० लाख कर्ज घेतले होते. या रक्कमेपैकी ७० लाख फेडले आहेत. जेंव्हा आम्ही उरलेले ५० लाख रुपये देण्यास गेलो, तेव्हा पतसंस्थेने आम्हाला १ कोटी ६८ लाख भरा नाहीतर फौजदारी दावा करू असे सांगितले. आम्ही त्यांना तुम्ही तारण ठेवलेली जागा ताब्यात घ्या आणि पैसे वळते करून घ्या असे सांगितले असताना देखील त्यांनी आमच्यावर खोटी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या पतसंस्थेची ही जुनी वसुली पद्धत आहे आणि म्हणून पतसँस्थेवर चौकशीचे आदेश देखील अरगडे न्यायालयाने एक महिन्यापूर्वी दिले आहे. तरी आमच्यावर केलेला गुन्हा खोट्या स्वरूपाचा व नाव खराब करून पैसे वसूल करण्याच्या हेतूने केला आहे, असे टेमघरे कुटुंबियांनी कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी