आळेफाटा येथे घरफोडी करुन पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 19:05 IST2018-05-14T19:05:43+5:302018-05-14T19:05:43+5:30

काळेशेत येथे राहत्या घरातून दीड लाखांचे दागिने व वीस हजारांची रोख रक्कम असा ऐवज चोरांनी लंपास केला.

0ne lakh seventy thousand ammounts material theft at Aalephata | आळेफाटा येथे घरफोडी करुन पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

आळेफाटा येथे घरफोडी करुन पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

ठळक मुद्देचोरी झाली त्यावेळी गुंजाळ कुटुंबीय शेजारी मात्र चोरीचा सुगावा नाही.

आळेफाटा : गुळुंचवाडी परिसरातील काळेशेत येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचा एक लाख सत्तर हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रविवारी  (दि. १३ एप्रिल ) रात्री अकराच्या सुमारास काळेशेत येथे सुभाष रंगनाथ गुंजाळ यांच्या राहत्या घराचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडुन आतील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, दीड तोळे सोन्याचा हार, झुबे व गळ्यातील चैन असा दीड लाख रूपयांचा सोन्याचा ऐवज व वीस हजार रोख रुपए लुटून पोबारा केला. 
  दरम्यान चोरी झाली त्यावेळी गुंजाळ कुटुंबीय शेजारी होते. मात्र त्यांना चोरीचा सुगावा लागला नाही. चोरी झाल्याची बाब सुभाष गुंजाळ यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती डमाळे पुढील तपास करत आहे.      

Web Title: 0ne lakh seventy thousand ammounts material theft at Aalephata