"तुमच्याप्रमाणे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही,’’ रोहित पवारांचं दरेकरांना चोख प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 03:27 PM2021-04-12T15:27:00+5:302021-04-12T15:28:36+5:30

Rohit Pawar replied to Praveen Darekar : कोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळीवर पोहोचला असतानाच राज्यात कोरोना लस तसेच कोरोनावरील उपचारांत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे

"like you we are not hidden Medicine in the party office," Rohit Pawar replied to Praveen Darekar | "तुमच्याप्रमाणे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही,’’ रोहित पवारांचं दरेकरांना चोख प्रत्युत्तर 

"तुमच्याप्रमाणे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही,’’ रोहित पवारांचं दरेकरांना चोख प्रत्युत्तर 

Next

मुंबई - कोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळीवर पोहोचला असतानाच राज्यात कोरोना लस तसेच कोरोनावरील उपचारांत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही राज्यात तुटवडा निर्माण झाला असून, या रेमडेसिविरवरून (remdesivir) आता राजकारणही पेटले आहे. भाजपाने (BJP) गुजरातमधील कार्यालयामधून रेमडेरिविर मोफत वाटल्याने त्यावर राष्ट्रावादीने (NCP) टीका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?" असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी प्रवीण दरेकर यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ( "like you we are not hidden Medicine in the party office," Rohit Pawar replied to Praveen Darekar)

देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सूरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे?," असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विचारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?" असा सवाल दरेकरांनी विचारला होता. दरम्यान दरेकरांना आता रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. 

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आदरणीय प्रवीण दरेकर साहेब रेमडेसिविरचे बॉक्स हे शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी वेल्फेअर निधीमधून सोलापूर आणि इतर जिल्ह्यामधील गरीब, गरजू रुग्णांना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत देता यावेत यासाठी दिले आहेत. तुमच्याप्रमाणे हे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही.  

 गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात रेमडेसिविरचं इंजेक्शन मोफत देण्यात येत होतं. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं होतं. दरम्यान, गुजरात भाजपा अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजपा कार्यालयातून 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित लोकांच्या नातेवाईकांना देण्यात येत असल्याचे म्हटले होते. परंतु जेव्हा ही लस स्टॉकमध्ये नाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालयातून ही कशी उपलब्ध झाली असा सवाल विरोधकांनी केला आहे. सूरतमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर रेमडेसिवीर इजेक्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती समोर आली होती. 

Web Title: "like you we are not hidden Medicine in the party office," Rohit Pawar replied to Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.