will resign as an MP and get rid of politics: Chhatrapati Udayan Raje over Maratha Reservation | ...नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार: छत्रपती उदयनराजे

...नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार: छत्रपती उदयनराजे

ठळक मुद्देसध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं.अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती उदयनराजेंनीही यात उडी घेतली आहे. मी राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.

सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं उदयनराजे म्हणाले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन असं त्यांनी सांगितले. तर पोलीस भरतीवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन् काय नाही असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.

...तर उद्रेक होईल

मराठा समाज आज प्रश्न विचारतायेत, आरक्षणावर अन्याय का? उद्या काय करतील मला सांगता येत नाही, राजकीय पक्षांबद्दल संताप व्यक्त होत आहे. आरक्षणावर शरद पवार का गप्प आहेत त्याचे उत्तर तेच देऊ शकतील, मी जे तळमळीनं बोलतोय, मुलभूत प्रश्न समजून घेत नसाल, त्यावर पर्याय काढत नाही, मी सांगकाम्या नाही, कोणीही उठावं आणि सांगावं, कोर्टाचा अवमान करत नाही, पण ती माणसचं आहेत त्यांनी विचार करायला हवा आहे. मी जे बोलतो अंत:करणातून मांडतो, शरद पवार ज्येष्ठ आहेत, मी त्यांचा प्रवक्ता नाही त्यांच्याबद्दल बोलायला. तोडगा काढायची वेळ संपली, परिणामांना सामोरं जावं, लोकांनी जाब विचारला पाहिजे असं उदयनराजे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले

प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले, मराठा समाजातील काही नेत्यांनाच मराठा आरक्षण नको, या लोकांना जनाची नाही किमान मनाची लाज असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मराठा समाज या सर्व नेत्यांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावून टाकेल.  नेतृत्व कुणाचंही असो, विचार महत्त्वाचा, सर्व देवांची शपथ घेऊन सांगतो आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर अनर्थ होईल असंही उदयनराजेंनी सांगितले. 

छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडू नका

छत्रपतींच्या घराण्यात फूट पाडू नका, दोन्ही राजे आमच्यासाठी आदरणीय आहेत, ज्यावेळी मराठा मोर्चा मुंबईत आला होता. तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळाशी सरकारचं बोलणं झालं. सरकारशी चर्चा झाल्यानंतर संभाजीराजेंनी मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर जाऊन सगळे निर्णय सांगितले. स्वत: मी मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा आभार मानताना मी संभाजीराजे आणि उदयनराजेंचे आभार मानले. सातत्याने समाजाला एकवटून हा लढा योग्य तसा होईल यासाठी उदयनराजेंनी प्रयत्न केले आहेत. उदयनराजेंचाही मराठा लढ्यात मोठा वाटा आहे. या दोघांच्या मनातही नेतृत्वाबाबतचा वाद नसेल. त्यामुळे विनाकारण नेतृत्वाचा मुद्दा काढून छत्रपतींच्या घराण्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंना फटकारलं आहे.

रविवारी मुंबईभर मराठा समाजाचं आंदोलन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती आदेशानंतर राज्य सरकारचे निर्णय आणि कृती मराठा समाजाला डिवचणारी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही समाज शांत होता, संयमाने व्यक्त होत होता. तरीही राज्य सरकारने अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबविण्याचा, पोलीस भरतीचा निर्णय घेतला. मराठा विद्यार्थी आणि तरुणांवर अन्याय करण्याची सरकारची भूमिका आहे. आरक्षणासह या सर्व प्रश्नांवर तातडीने योग्य निर्णय न झाल्यास रविवारी मुंबईभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा – विनायक मेटे

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातून आलेल्या स्थगितीमुळे समाजामध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण पसरले. राज्य सरकार गेल्या ५-६ दिवसांपासून पोकळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांमध्ये सध्या एकवाक्यता दिसून येत नाही. या एकवाक्यतेसाठी सर्वांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केलं होतं.

संभाजीराजेंचा विनायक मेटेंना टोला

मराठा आरक्षणात दुर्दैवाने राजकारण होत आहे. मी मराठा समाजाचा घटक आहे मला नेतृत्व करायचं नाही, जे समाज म्हणेल त्याच्या पाठिशी मी उभा आहे. उदयनराजे असो वा मी छत्रपती घराणे एकच आहे. त्यामुळे विनायक मेटे काय म्हणता याला अर्थ नाही. मी कोणत्याही नेत्याबद्दल भाष्य केले नाही, प्रत्येकाची आपापली भूमिका आहे. २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ज्या कोणी भूमिका बदलल्या त्यांचं त्यांनाच ठाऊक आहे असं सांगत संभाजीराजेंनी टोला लगावला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही, पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय – संजय राऊत

...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ

भाजपाला आणखी एक धक्का?; शिरोमणी अकाली दलानंतर जेजेपीवर साथ सोडण्याचा दबाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलं देशवासियांना बर्थ डे गिफ्ट; ट्विटरवरुन शेअर केली विश लिस्ट

Web Title: will resign as an MP and get rid of politics: Chhatrapati Udayan Raje over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.