शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय झाले? पोलिसही हप्ते घेतात; भास्कर जाधवांचे वादग्रस्त वक्तव्य़

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 18:45 IST

Shivsena leader Bhaskar Jadhav Controversial statement : लॉकडाऊन मध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केले.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांविरोधात टीका करणाऱ्याना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात झोडपले असताना शिवसेनेचे नेते पोलीस आणि अवैध धंद्यांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. गुहागरचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी बेकायदा दारु विकणाऱ्या शिवसैनिकाला भरसभेत पाठीशी घालत पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप लावला आहे. 

शिवसेनेच्या उप तालुका प्रमुखाने पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले? पोलीस हप्ते घेत नाहीत का? असा सवाल केला आहे. भाजपाच्या नेत्याने सुरुची झाडे तोडून नेली तर त्याची साधी बातमी नाही आणि शिवसैनिकाने बेकायदा दारु विकली त्याचा फोटो छापला जातो, काही काळजी करू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, असे वक्तव्य जाधव यांनी केले आहे. 

याचबरोबर दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. मुलींची छेडछाड आणि चोरी, बाकी कोणत्याही प्रकरणात तुम्ही घाबरू नका, असे भर सभेत सांगत एकप्रकारे गुन्हेगारीलाच प्रोत्साहन दिले आहे. लॉकडाऊन मध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केले.

भाजपावरही टीकाभाजपच्या जीवावर महाराष्ट्रात शिवसेना निवडून आली असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचा भास्कर जाधव यांनी चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांच्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची जुनीच परंपरा आहे. ही परंपरा भाजप नेहमीच पाळत आली आहे. युती असूनही विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला कसा दगा दिला हे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात आज भाजप केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळेच आहे. तिकडे बिहारमध्ये जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही फक्त नरेंद्र मोदी यांना मानतो दुसरं कोणाला मानत नाही. पण बाळासाहेब ठाकरे  यांच्यामुळे नरेंद्र मोदी राजकारणात पुढे आलेत हे विसरून चालणार नाही.आज राम मंदिराची वीट उभारली जाणार असेल तर ती पहिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने लावली गेली पाहिजे असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliceपोलिसliquor banदारूबंदी