भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:22 PM2021-09-05T19:22:39+5:302021-09-05T19:23:12+5:30

ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार  उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे.

West Bengal CM Mamata Banerjee will contest the assembly bypolls from bhabanipur says TMC leader Madan Mitra | भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला 

Next

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम सीटवर शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. यानंतर आता, त्या भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. आपल्या या पारंपरिक जागेवर ममता एकहाती विजय मिळवतील, असा दावा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे. एवढेच नाही, तर भाजपने भवानीपूरमध्ये ममतांच्या विरोधात उमेदवार उभा करू नये अन्यथा पैसे वाया जातील, असे टीएमसी नेते मदन मित्रा यांनी म्हटले आहे. (West Bengal CM Mamata Banerjee will contest the assembly bypolls from bhabanipur says TMC leader Madan Mitra)

मोदी फिर से... जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान

ममता बॅनर्जी अपेक्षेप्रमाणे भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवतील, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे. तसेच, "आपण (भाजप) भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार  उभा करून पैसे बरबाद करू नका. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे," असे मित्रा यांनी म्हटले आहे.

ममतांची खुर्ची पणाला - 
ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टीकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना 5 नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होईल.

Web Title: West Bengal CM Mamata Banerjee will contest the assembly bypolls from bhabanipur says TMC leader Madan Mitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app