West Bengal Assembly Elections 2021mithun chakraborty said narendra modi says ready contest mamata banarjee | West Bengal Assembly Elections 2021 : "मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार"

West Bengal Assembly Elections 2021 : "मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार"

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रॅलीदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता. यानंतर ते आता जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. भाजपाने आपल्या उमेदवारांची शेवटची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये मिथुन यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र त्यानंतर आता मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे. आता पक्षाने काय तो निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. तसेच मोदींनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

मिथुन चक्रवर्ती हे भाजपाचे स्टार कँपेनर आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत" असं म्हटलं आहे. भाजपाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे या पदासाठी मिथुन चक्रवर्ती  इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शो ला मोठी गर्दी होत आहे. या गर्दीतून लोकांचं पंतप्रधान मोदींवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. त्यामुळे बंगालमध्ये बदल घडू शकतो असा अंदाज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांनी पुन्हा राजकारणात येण्याचा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपतील प्रवेशानंतर काही दिवसांतच त्यांना केंद्रानं Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपातील प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांसोबत मंचावर उभं राहण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं होतं. तसंच सभेदरम्यान ते आक्रमक भूमिकेतही दिसून आले होते. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकातामध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. 

"मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल"

"मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल" असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. ते कोलकाता येथे पार पडलेल्या ब्रिगेड ग्राऊंड येथील रॅलीत उपस्थित होते. "मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात," असंही मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. "हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे," असं ते म्हणाले होते. 

होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबुल सुप्रियो आणि एका तरुण कार्यकर्त्यात बोलताना काहीसा वाद झाला आणि यानंतर सुप्रियो यांनी कोणताही विचार न करता थेट या कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारली. पीडित तरुणाने खासदार सुप्रियो यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. 

Web Title: West Bengal Assembly Elections 2021mithun chakraborty said narendra modi says ready contest mamata banarjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.