शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

नंदीग्राममध्ये आज प्रचारसभा, शक्तिप्रदर्शनाचे धमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 04:25 IST

पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आले आहे.

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आले आहे. दुसऱ्या टप्प्यात  गुरुवार, १ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने आज मंगळवारी प्रचाराच्या सभांनी घमासान होणार होणार आहे.ममता बॅनर्जी यांनी निवडणूक जाहीर झाल्यावर अचानकपणे नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे खंदेसमर्थक अधिकारी सुवेंदु यांनी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत येऊन मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. सुवेंदु यांनीच बंडखोरी करुन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंदीग्राममधून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचे ठरविले. अधिकारी सुवेंदु यांच्या भाजप प्रवेशाने गृहमंत्री अमित शहा यांनी हा ममता बॅनर्जी यांचा मोठा धक्का आहे, असे जाहीर केले होते. दरम्यान, आपल्या कोलकत्यातील भवानीपूर मतदारसंघाऐवजी नंदीग्राममधून अधिकारी सुवेंदु यांनाच आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला.  त्यामुळे पश्चिम बंगालमधील ही निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानली जाऊ लागली आहे. सुवेंदु यांनी मागील निवडणूक तृणमुल काँग्रेसतर्फे लढविताना १ लाख ३४ हजार ६२३ मते घेऊन भाकपचे अब्दुलकबीर शेख यांचा ८१ हजार ४९० मतांनी पराभव केला होता. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१PoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा