शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Video: बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी; चोर म्हटल्याने निमित्त झाले

By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 5:32 PM

Bihar Assembly Election Result : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसत नाही तोच अवघ्या 19 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये नेता कोण बनणार यावरून तुंबळ हाणामारी पहायला मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांमध्येच हा राडा झाला आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत. तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटले आहे. तर दुसरीकडे राजदने एनडीएतील मित्रपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला आहे. अशातच काँग्रेसनेही आज नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली होती. 

काँग्रेस आमदारांच्या या बैठकीत शुक्रवारी मोठा राडा झाला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्याने मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटांत मोठा राडा झाला आणि शिवीगाळही करण्य़ात आली. 

महाराजगंजहून आमदार विजय शंकर दुबे आणि विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसच्या गटनेता कोण होणार यावरून बाचाबाची झाली. यावेळी सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेंना चोर म्हटले. यामुळे संतापलेल्या झालेल्या दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले. 

यानंतर नेत्यांमध्ये राडा झाल्याचे कळताच बाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यांनीही बैठकीकडे धाव घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

"आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं; पुन्हा मतमोजणी करा", तेजस्वी यादवांची मागणी बिहारनिवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले आहे. तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली आहे. 

"जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. 2015 मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार