सिनेमातील दगडू शांताराम परबची राजकारणात एन्ट्री; मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 14:31 IST2020-09-09T14:28:44+5:302020-09-09T14:31:59+5:30
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश...

सिनेमातील दगडू शांताराम परबची राजकारणात एन्ट्री; मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दगडू फेम प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रख्यात कलाकारांनी उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks lयांच्या उपस्थितीत आज @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil जयंत पाटील यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.@rajeshtope11@supriya_sule#NCPpic.twitter.com/Ia1NnCEUEB
— NCP (@NCPspeaks) September 9, 2020
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.