शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहकारावर गंडांतर येण्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 06:17 IST

Sharad Pawar : सहकार हा घटनेनुसार राज्य सरकारचा विषय, पवार यांचे वक्तव्य. पटोले लहान व्यक्ती, त्यांच्याबद्दल बोलणार नाही म्हणत पवारांचा टोला. 

ठळक मुद्देसहकार हा घटनेनुसार राज्य सरकारचा विषय, पवार यांचे वक्तव्य. टोले लहान व्यक्ती, त्यांच्याबद्दल बोलणार नाही म्हणत पवारांचा टोला. 

बारामती : सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निमाण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. याबाबत येणाऱ्या बातम्यांनादेखील फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही. मल्टिस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्राचे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. मागील दहा वर्षे आपण कृषी खाते सांभाळत असतानाही हा विषय होता आणि आताही आहे.

एकविचाराने राज्यकारभारआम्ही पक्ष एकत्र चालवत नाही तर सरकार एकत्र चालवत आहोत. त्यामुळे एका विचाराने सरकार चालवण्यावर आम्ही ठाम आहोत. त्यात कोणताही वाद नाही.  प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या संघटनेची व्याप्ती वाढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेस तसेच शिवसेना या पक्षांनी याबाबत भूमिका घेतली तरी त्यात वावगे काही नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं का हीही नाही. सरकार एकविचाराने आहे की नाही हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. 

नाना पटोले लहान माणूस, त्यांच्याबद्दल बोलणार नाही

  • नाना पटोले यांनी काही वक्तव्य केले असेल तर त्यासंदर्भात मला काही बोलायचे नाही. ती लहान माणसे आहेत. सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना आपण जास्त महत्व देत नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. 
  • दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेले का खुपते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला होता. 
  • पुण्याचे पालकमंत्री आपले काम करत नाहीत. शत्रूला त्याच्या घरात जाऊन मारू, अशी पुस्तीही पटोले यांनी जोडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावर माध्यमांनी पवार यांना छेडले असता त्यांनी पटोले यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देत नसल्याचे सांगितले.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेचआमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत. समान नागरी कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. सरकार काय करते यावर आमचे लक्ष आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोले