"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

By मोरेश्वर येरम | Published: December 3, 2020 07:12 PM2020-12-03T19:12:17+5:302020-12-03T19:27:50+5:30

तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

talks with sonia gandhi on regular basis over government work says uddhav thackeray | "सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

Next
ठळक मुद्दे'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' पुस्तिकेचं प्रकाशनमहाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कामगिची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशमहाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम असल्याचा ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम झाला. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

"राज्याचं तीन पक्षांचं सरकार तग धरेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण या तीन पक्षाच्या सरकारला शरद पवारांसारखं अनुभवी मार्गदर्शन लाभलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील फोनवरुन काम कसं चाललंय याची विचारपूस करत असतात. आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? असंही त्या विचारात", उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी,"मी सोनियाजींकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथं मी मागे हटत नाही", असं म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामाचं सोनिया गांधी यांच्याकडे कौतुक करत असल्याचं सांगितलं.

राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

मी अनुभवी नसलो तरी अनुभवी टीमची साथ
"राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नाही अशी टीका केली जात होती. पण अनुभवी सहकाऱ्यांची टीमसोबत असल्याने मला कसलीच चिंत वाटली नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत असं वारंवार विरोधक बोलतात. त्यांना सांगायला हवं की माझ्या सहकाऱ्यांची टीम घरीघरी जाऊन काम करतेय त्यामुळे मला बाहेर पडावं लागत नाही. इतकं भक्कमपणे हे सरकार उभं आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जनतेच्या विश्वासाच्या चौथ्या चाकाची सरकारला जोड
"जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. पण या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे", असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Web Title: talks with sonia gandhi on regular basis over government work says uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.