शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

अधिवेशनासाठी रणनीती, ममता बॅनर्जी आज दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 7:10 AM

कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली:  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीचा दौरा करणार असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्याबरोबरच संसद अधिवेशनासाठी रणनीती तयार करणार आहेत. संसदेचे अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याची शक्यता आहे. ममता दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची शक्यता आहे. राज्याची थकबाकी व बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविण्यासारख्या अनेक मुद्यांवर त्या मोदींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत.

ममता बॅनर्जी यापूर्वी जुलैमध्ये दिल्लीत आल्या होत्या. एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्या प्रथमच दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळीही विरोधकांचे ऐक्य करण्यावर त्यांचा भर होता. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकार क्षेत्र आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किलोमीटरहून ५० किलोमीटरपऱ्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या मुद्यावर त्यांनी यापूर्वीच आक्षेप नोंदविलेला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या भावना कळविलेल्या आहेत. या दौऱ्यातही ममता हा मुद्दा उपस्थित करतील, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसdelhiदिल्ली