शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

गृहमंत्री बदलण्यााबाबत जयंत पाटील यांनी दिले असे संकेत दिले, अनिल देशुमखांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:26 PM

Home Minister and Mumbai Police Commissioner will change : सचिन वाझे प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी (mukesh ambani explosive news) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. एनआयएने केलेल्या चौकशीमध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी काही बडे पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (State Home Minister and Mumbai Police Commissioner will not change, informed Jayant Patil)

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेण्याची गरज नाही. त्यामुळे अशा वावड्या उठवण्याची गरज नाही. राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नाही. 

सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केल्याचे दिसून आलेले नाही. गृहमंत्री अनिल देशमुख हे योग्य प्रकारे काम करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला एटीएस तपास करत होती. नंतर त्यात एनआयएने तपास सुरू केला. त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई झाली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही. तपासामधून जे सत्य समोर येईल, ते न लपवता आम्ही कारवाई करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं होतं, तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुखांपासून इतर सत्ताधारी आमदारांनी वाझेंची पाठराखण केली होती, इतकचं नव्हे तर सचिन वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता. सध्या NIA कडून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे सापडल्याने NIA ने त्यांना अटक केली आहे, यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदावर गंच्छती येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसPoliticsराजकारण