Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:50 PM2021-04-12T13:50:29+5:302021-04-12T13:53:04+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १४ एप्रिलला बेळगावत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Shivsena Sanjay Raut will Going for Campaigning of Shubham Shelke in belgoan election | Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार

Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार

googlenewsNext
ठळक मुद्देबेळगाव मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघात भाजपाचे सुरेश अंगडी निवडून आले होते.सुरेश अंगडी यांचे सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळे येथील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मुंबई – बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. तत्पूर्वी बेळगावात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे.( Shivsena Sanjay Raut will Going for Campaigning of Shubham Shelke in belgoan election)  

शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १४ एप्रिलला बेळगावत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. बेळगाव मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघात भाजपाचे सुरेश अंगडी निवडून आले होते. परंतु त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केलेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही या मतदारसंघात उमेदवार उतरवला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

कोण आहे शुभम शेळके?

शुभम शेळके हे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही; पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी ठरले. त्यांचे नाव युवावर्गातून पुढे आले. आता त्यांच्या प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे. यामुळे मराठी म्हणून जो कोणी या मतदारसंघात आहे, त्याचे मत शुभम यांना पडावे, हे एकमेव ध्येय आता युवकांनी बाळगले आहे. शुभम शेळके याच्या प्रचारासाठी लोक स्वत:हून वर्गणी गोळा करत आहे. जिथे शुभम प्रचाराला जाईल तिथे लोकं ५०० ते १००० रुपयांची मदत करत आहेत. त्यामुळे भाजपा, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही शुभम शेळकेची दखल घेणं भाग पडत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुरेश अंगडी ३ लाखांच्या मताधिक्यांनी याठिकाणाहून निवडून आले होते. मात्र सप्टेंबर २०२० मध्ये अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. १७ एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहे. भाजपानं याठिकाणी सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेने कृष्णाजी पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी कृष्णाजी पाटील यांचा अर्ज मागे घेण्यात आला.

Web Title: Shivsena Sanjay Raut will Going for Campaigning of Shubham Shelke in belgoan election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.