शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

West Bengal Assembly Elections 2021 : "भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:34 IST

Shivsena Sanjay Raut And Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021 : "पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत."

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut ) यांनी देशातील चार राज्यांच्या निवडणुका या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार आहेत. खासकरून पश्चिम बंगाल आणि आसाम असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Elections 2021) भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. यासोबतच लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करु नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  Shivsena Sanjay Raut And Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021

"पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम….केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी नेत्यांना लिहिलेल्या पत्रावर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. "या देशात नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करू. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरू केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल" असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

"लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करू नये"

लॉकडाऊनबाबत ही राऊतांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यांनी त्यावरही उत्तर दिलं आहे. "लॉकडाऊन किंवा कोरोनाचं राजकारण करू नये. राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जनतेच्या हिताचं सांगत आहेत. सगळ्या विरोधी पक्षाच्या घटकपक्षांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे" असं म्हटलं आहे. तसेच "पंतप्रधान मोदी यांनी काय प्रेमाने, आनंदाने लॉकडाऊन केला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील कठोर निर्बंध लावू इच्छित आहे, ती काही त्यांच्यासाठी आनंदाची बाब नाही. पण काय करणार?" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'

पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपा नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल (Pralay Pal) यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. मात्र याता यावर ममता बॅनर्जींनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. "हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता" असं म्हणत त्यामागचं नेमकं कारण आता ममतांनी सांगितलं आहे. टीएमसीने आधी या फोनचा दावा फेटाळून लावला होता. पण आता ममता बॅनर्जींनी फोन केल्याचं समोर आलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी "तृणमूल काँग्रेसच्या एका माजी नेत्याला ज्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला आपण फोन केला होता. फोन करणं कुठलाही गुन्हा नाही. दोषी त्यांना ठरवलं पाहिजे, त्यांनी विश्वासघात केला आणि चर्चा लीक केली" असं म्हटलं आहे. तसेच "हो, मी नंदीग्राममधील एका भाजपा नेत्याला फोन केला होता. कोणाला तरी आपल्याशी बोलायचं, असं सांगण्यात आलं होतं. यामुळे त्यांचा नंबर घेऊन आपण फोन केला होता. तुम्ही तिथे व्यवस्थित राहा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असं मी त्यांना म्हणाले होते. हा काय माझा गुन्हा आहे का?" असा सवाल देखील ममता बॅनर्जींनी केला आहे. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसIndiaभारतWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Politicsराजकारण