शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, शिवकुमार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:51 IST

कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा आपले काम करील.

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा आपले काम करील.शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्यासाठी ते लोकांना समोर आणून निवेदन करण्यास भाग पाडत आहेत. सरकारने काहीही केले तरी मी पोलिसांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करावी व त्यांच्या आत्मसन्मानाचे रक्षण करावे.या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत असून, पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात ते म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पीडितेने माध्यमांसमोरही निवेदन केले. याचा तपास झाला पाहिजे. शनिवारच्या घटनाक्रमानंतर पीडितेने एसआयटीसमोर येऊन निवेदन द्यावे, असे आपणास वाटते काय, यावर ते म्हणाले की, मला या विषयावर काहीही म्हणायचे नाही. मी राज्यातील पोटनिवडणुकांवर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रदेशाध्यक्षांनी मानहानीचा खटला दाखल करण्याच्या शक्यतेचाही त्यांनी इन्कार केला. या प्रकरणाला शनिवारी अचानक वेगळे वळण मिळाले. त्या दिवशी पीडितेच्या माता-पित्यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीचा वापर करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे घाणेरडे राजकारण करीत आहेत. आमच्या कुटुंबाचे काही बरे-वाईट झाले तर त्याला शिवकुमार जबाबदार असतील, असेही ते म्हणाले होते. त्यांची मुलगी एखाद्या अज्ञात स्थळी असून, काँग्रेस नेत्याने तिला परत पाठवावे, अशी विनंतीही तिच्या आई-वडिलांसह भावाने केली होती. त्यामुळे खळबळ उडाली.पीडितेच्या कुटुंबीयांनी हे निवेदन दिल्यानंतर जरकिहोली यांनी शिवकुमार यांच्यावर टीका केली. शिवकुमार यांच्याविरुद्ध राजकीय व कायदेशीर लढाई लढण्याचीही त्यांनी घोषणा केली. शिवकुमार हे रविवारी जेव्हा बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जरकिहोली यांच्या मूळ जिल्ह्यात बेळगाव येथे दाखल झाले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्याचवेळी माजी मंत्री व गोकाक येथील भाजपचे आमदार गोकाक यांच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले व परत जा, परत जा, अशी नारेबाजी केली. दरम्यान, पीडितेचे वकील जगदीश यांनी सांगितले की, आपला जबाब नोंदविण्यासाठी ती सोमवारी न्यायालयात हजर होऊ शकते. 

जबाब नोंदविण्याची भीती वाटते -पीडिता शनिवारच्या घटनाक्रमानंतर पीडितेने एक व्हिडिओ जारी करून म्हटले होते की, तिचे आई-वडील कोणाच्या तरी दबावाखाली येऊन बोलत आहेत. हे सर्व पाहून मला एसआयटीसमोर हजर होऊन जबाब देण्याची भीती वाटते. मला न्यायाधीशांसमोर उभे राहून जबाब नोंदविण्यासाठी मदत करावी, असेही तिने म्हटले होते.  

पीडितेच्या आई-वडिलांना सुरक्षाराज्याचे गृहमंत्री बसावराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, व्हिडिओ, ऑडिओ व सीडीची शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करून एसआयटी सत्य बाहेर आणील. पीडितेला संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, पाच नोटिसा दिल्या आहेत तसेच तिच्या आई-वडिलांनाही सुरक्षा दिली आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा