शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

...अन् बोलता बोलता संजय राऊत त्यांना उंदिर म्हणून गेले; भाजपकडून प्रत्युत्तर मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 22:04 IST

shiv sena mp sanjay raut slams governor bhagat singh koshyari: टीका करत असताना संजय राऊतांनी दिली उंदराची उपमा; राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीवरून राऊतांचा निशाणा

मुंबई: भारतीय जनता पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये मोदी सरकार राज्यपालांच्या माध्यमातून आडकाठी करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कालच पत्रातून केला. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना यांच्यासह देशातल्या अनेक नेत्यांना पत्र लिहिलं. हाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लक्ष्य केलं. (shiv sena mp sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 proposed mlcs)तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? संजय राऊत यांचं रोखठोक उत्तर; म्हणाले...महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्यांची यादी कोश्यारी यांना कधीच सोपवली आहे. पण अद्याप त्या यादीला राज्यपालांना मंजुरी दिलेली नाही. राज्यपालांनी त्या १२ सदस्यांचं जवळपास एक वर्ष खाल्लं. या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. पण त्यांचं १ वर्ष राज्यपालांमुळे वाया गेलं. हे १२ सदस्य ठरलेल्या वेळेनुसार, त्यांचा कार्यकाळ संपल्यावर निवृत्त होतील. पण त्यांची नियुक्ती वेळेवर झालेली नाही, असं राऊत म्हणाले.बारा सदस्यांची यादी राज्यपाल मांडीखाली दाबून बसले आहेत. त्यांचं एक वर्ष राज्यपालांनी खाल्लं आहे. अजून किती खाणार आहात? अजून किती कुरतडणार आहात उंदरासारखं? पण तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही घटना, संविधान कुरतडत आहात. या घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. सरकारनं दिलेल्या यादीला मंजुरी दिल्यास सरकारची ताकद आणखी वाढेल, असं त्यांना वाटत असेल. त्यामुळेच ते यादीला मंजुरी देत नसतील, असं राऊत पुढे म्हणाले."भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल"तीन महिन्यात राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशा प्रकारचं सूचक विधान अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केलं होतं. त्यावर सरकार पडण्याच्या तारखा सरकार स्थापन झाल्यापासून दिल्या जात आहेत. दीड वर्ष असंच गेलं. तीन महिने कशाला थांबता, तीन दिवसांत सरकार पाडा, असं आव्हान राऊत यांनी दिलं. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जींना यश मिळेल. तृणमूल काँग्रेस सत्ता राखेल. त्या निवडणुकीनंतरही महाराष्ट्रात काही होणार नाही. वेळेला ४ आमदार मिळत नाहीत. भाजप तर बहुमताच्या आकड्यापासून ३९ नं दूर आहे, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार