"पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 08:46 PM2021-01-24T20:46:10+5:302021-01-24T23:48:11+5:30

Sharad Pawar News : पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून महाविकासआघाडीमध्येच वाद पेटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.

Shiv Sena leader Vijay Shivtare criticizes Sharad Pawar issue of Purandar Airport | "पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका

"पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका

Next

पुणे - स्थानिकांच्या विरोधामुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नियोजित असलेला विमानतळ चर्चेत असतो. मात्र आता या पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून महाविकासआघाडीमध्येच वाद पेटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवार यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. असे असले तरी हा विमानतळ कुठल्याही परिस्थितीत पुरंदरहून बारामतीला नेऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.

विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. शिवतारे म्हणाले की, पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ जागा बदलून बारामतीच्या सीमेवर नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. या विमानतळाची आधीची जागा बदलून नव्याने पुरंदर तालुक्यातील काही गावांची जागा घेऊन विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीचा विकास साधेल. तर विमानतळामागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी वाढणार. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा, शिवतारे यांनी दिला आहे.


दरम्यान, पुरंदरमधील या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. या विमानतळाला जागा देणार नाही, अशी भूमिका शेतकरी आणि स्थानिकांनी घेतलेली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी या विमानतळाच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

Web Title: Shiv Sena leader Vijay Shivtare criticizes Sharad Pawar issue of Purandar Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.