शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 10:03 IST

Sanjay Raut : संजय राऊत यांनी उलगडला आपला जीवनप्रवास. राऊत यांनी शेअर केले मजेदार किस्से.

ठळक मुद्देसंजय राऊत यांनी उलगडला आपला जीवनप्रवास. राऊत यांनी शेअर केले मजेदार किस्से.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम करायचं आहे हे मनात पक्क होतं, अशी एक आठवण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपला प्रवास उलगडताना सांगितली. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक खास मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेकविध विषयांवर मनसोक्त आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. "मला पत्रकाराचीच भूमिका आवडते. मी कधीही पत्रकारीता दूर होऊ दिली नाही. खासदारकी, शिवसेनेचं नेतेपद सगळ्या गोष्टी पत्रकार असल्यानं माझ्याकडे आल्या. मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करायचं हे मनात पक्क होतं. माझं कुटुंब त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करत होतं. खासदार, मंत्री हे माझं स्वप्न होतं," अस संजय राऊत म्हणाले.

... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत

"राजकारणात नसतो तर मी पत्रकारचं झालो असतो. पत्रकारीतेलाच मी माझा पेशा म्हणून स्वीकारलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ असल्यामुळे राजकारणात आलो. सामना या वृत्तपत्राची दखल ही सर्वत्र घेतली जाते. त्याचा संपादक हा राजकारणीच असतो. संपादकांना एखादी भूमिका असावी, ती नसली तर वृत्तपत्र पुढे नेता येणार नाही. टिळक, आगरकर, अत्रे यांनाही भूमिका होती," असंही राऊत म्हणाले."सामना हे माझं खरं घर आहे. माझं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी काढलं. मी शिवसेना भवनात जातो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी अनेकदा मातोश्रीवर जायचो, देशभरात जातो, अशा अनेक गोष्टी मला आवडतात," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या घरातील एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझ्या मुलींना वाटतं की मला काही गोष्टींचं ज्ञान नाही. मग त्या मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. घरी आल्यावर युट्यूब वगैरे अशा काही गोष्टी करतो. त्या मला अनेक गोष्टी या पाहा ते पाहा हे सांगत असतात. सध्याची पीढी ही इतिहासापासून तुटत चाललीये. सध्या जे चाललंय तेच त्यांना इतिहास वाटतो. देश कसा घडला याचा इतिहास त्यांना माहित नाही," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणJournalistपत्रकारLokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे