Sanjay Raut arrange dinner party today in Delhi; Bjp MP's also invited | Sanjay Raut: इकडे महाराष्ट्रात तांडव! तिकडे संजय राऊतांच्या घरी मेजवानी; भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण

Sanjay Raut: इकडे महाराष्ट्रात तांडव! तिकडे संजय राऊतांच्या घरी मेजवानी; भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण

महाराष्ट्रात एकीकडे १०० कोटींच्या वसुलीप्रकरणावरून राजकारण तापलेले आहे. दुसरीकडे भाजपा या प्रकरणावरून राज्यपालांच्या भेटीपासून ते केंद्रापर्यंत आवाज उठवत आहे. या साऱ्या काळात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या सत्तास्थापनेत मुख्य भूमिका निभावणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay raut ) दिल्लीत मोठी मेजवानी ठेवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या डिनर डिप्लोमसीची चर्चा होऊ लागली आहे. (Uproar in Maharashtra, Shiv sena's Sanjay raut arrange Party in Delhi for Maharashtra MPs. )


राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीतील घरी रात्री पार्टीचे आयोजन केले आहे. महत्वाचे म्हणजे या पार्टीचे भाजपासह सर्व महाराष्ट्रातील खासदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातील घडत असलेल्या घडामोडी आणि केंद्रात वर्षभरापूर्वी भाजपाची साथ सोडल्याने शिवसेनेच्या खासदाराने बोलविलेल्या भोजनाला भाजपाचे खासदार जातात की नाही अशी चर्चा रंगली आहे. 


खरेतर संजय राऊतांनी या पार्टीचे आयोजन काही दिवस आधीच केले होते. तेव्हा महाराष्ट्रात १०० कोटींची वसुली बॉम्ब फुटला नव्हता. राऊतांनी भाजपाच्या खासदारांनाही निमंत्रण दिले होते. 


दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला होता. जावडेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यसभेत गदारोळ उठल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सांगितले होते. तसेच राज्यसभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली होती. या साऱ्या गदारोळावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मोठ्या काळापासून प्रयत्न सुरु आहेत. परमबीर सिंगांविरोधात काही आरोप आहेत, त्याची चौकशी होत असल्याचे सांगितले. 


खासदार नवनीत राणा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. निलंबित झालेल्या पोलिसाला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझेला पोलीस दलात घेण्याची विनंती केली होती. फडणवीसांनी ती नाकारली. जेव्हा ठाकरे सरकार आले तेव्हा त्यांनी वाझेंना परत घेतल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. 

Web Title: Sanjay Raut arrange dinner party today in Delhi; Bjp MP's also invited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.