Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकाप्रकरणी मनसेचा खळबळजनक दावा; ‘तो’ मोठा मंत्री कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 05:38 PM2021-03-17T17:38:52+5:302021-03-17T17:41:17+5:30

Mukesh Ambani Bomb Scare: २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ही स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती, यानंतर मुकेश अंबानींच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं गेलं

Sachin Vaze: MNS sensational claim in Mukesh Ambani house bomb scare case | Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकाप्रकरणी मनसेचा खळबळजनक दावा; ‘तो’ मोठा मंत्री कोण?

Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकाप्रकरणी मनसेचा खळबळजनक दावा; ‘तो’ मोठा मंत्री कोण?

Next
ठळक मुद्देएनआयएच्या (NIA) पथकाने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी दिली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांच्या अंतर्गत वादातून हे सगळं बाहेर आलं. लवकरच २-३ दिवसात याबाबत पत्रकार परिषद घेऊन मोठा स्फोट होणार असल्याचा दावा

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळबळजनक दावा केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी एका मोठ्या मंत्र्याने सुपारी घेऊन हा सगळा कट रचला आहे असा गंभीर आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या या आरोपामुळे नेमका ‘तो’ मंत्री कोण अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.(For Helipad Permission on Mukesh Ambani House, Big Planned by Minister, MNS Avinash Jadhav Claims)   

 

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ही स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली होती, यानंतर मुकेश अंबानींच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं गेलं, यात सुरुवातीला एका दहशतवादी संघटनेने पत्रक काढून मुकेश अंबानी यांना हा ट्रेलर असल्याची धमकी दिली होती, मात्र परंतु हे पत्रक बनावट असल्याचं सिद्ध झालं, त्यानंतर या प्रकरणात ज्या मालकाची गाडी आढळली आहे. त्या मनसुख हिरेन(Mansukh Hiren Death) यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळून आला होता. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचं गुढ वाढलं होतं.

सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश

यातच अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हा सगळा कट रचण्यात आला होता, त्यामुळे याचा तपास होणं गरजेचे आहे. एका मोठ्या मंत्र्याने सुपारी घेऊन हा कट रचला असा आरोप मनसेने केला आहे. याबाबत टीव्ही ९ ने अविनाश जाधव यांची मुलाखत घेतली, त्यात ते बोलत होते. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांच्या अंतर्गत वादातून हे सगळं बाहेर आलं. NIA या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करत आहेत, लवकरच २-३ दिवसात याबाबत पत्रकार परिषद घेऊन मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही मनसेचे अविनाश जाधव यांनी केला आहे.

CCTV मध्ये दिसणारी तीव्यक्ती सचिन वाझेच

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जे सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं, त्यात एक व्यक्ती संशयास्पदरित्या पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु NIA च्या तपासात ही व्यक्ती पीपीई किट्स नव्हे तर पांढऱ्या रंगाचा मोठा कुर्ता आणि डोक्यावर रुमाल घेतल्याचं समोर आलं आणि ही व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून सचिन वाझेच असल्याचा खुलासा NIA ने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे. NIA ने म्हटलंय की, CCTV फुटेजमध्ये सचिन वाझे मोठ्या रुमालाने स्वत:चं डोकं लपवत जाताना दिसतात, कारण त्यांना कोणी ओळखू नये, त्याचसोबत बॉडी लॅग्वेंज आणि चेहरा लपवण्यासाठी त्यांनी मोठ्या आकाराचा कुर्ता-पायजमा घातला होता, पीपीई किट्स नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच सचिन वाझे यांच्या कार्यालयात NIA ने छापा टाकला होता, त्यात लॅपटॉप जप्त केला, त्यातील डेटा आधीच डीलिट करण्यात आला होता

सचिन वाझेंकडे जेव्हा फोनची विचारणा केली तेव्हा मोबाईल कुठेतरी गडबडीत ठेवल्याचं वाझे म्हणाले, परंतु खऱ्या अर्थानं जाणूनबुजून सचिन वाझेंनी त्यांचा फोन फेकून दिला असल्याचं NIA ने म्हटलं आहे.

 सचिन वाझे-मनसुख हिरेन प्रकरणात नवा गौप्यस्फोट?; देवेंद्र फडणवीस दिल्लीत, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

'ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो'

दरम्यान, एनआयएच्या (NIA) पथकाने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाशी संबंध असलेली स्कॉर्पियो आणि इनोव्हा गोडी जप्त केल्यानंतर NIA ने मंगळवारी एक मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीही जप्त केली आहे. सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते. जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा  वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी  करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले.

Web Title: Sachin Vaze: MNS sensational claim in Mukesh Ambani house bomb scare case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.