शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

रोहित पवारांकडून केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत; समान संधी देण्याची नरेंद्र मोदींकडे विनंती

By प्रविण मरगळे | Published: January 07, 2021 12:05 PM

या अंतर्गत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य आणि भागीदारी असलेली संस्थात्मक यंत्रणा उभी राहील

ठळक मुद्देभारत आणि जपान यांच्या नागरिकांमधील एकमेकांची संपर्क वाढण्यास मदत होणार आहेकरारानुसार भारतातील कुशल कामगारांना जपानमध्ये पाठण्यास सहकार्य मिळेलया संधीचा फायदा देशातील सर्व राज्यातील युवांना समान पद्धतीने मिळावी अशी विनंती

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात, केंद्र असो वा राज्य सरकारच्या निर्णयावर ते भाष्य करत असतात, अनेकदा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवरून रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, भाजपावर टीका केली आहे, स्वत:वरील टीकेलाही योग्य शब्दात उत्तर दिलं आहे. त्याचसोबत काही चांगले निर्णय झाले तर त्याचं कौतुकही केले आहे. त्याचाच प्रत्यत पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच जपानसोबत काही साम्यंजस्य करार केले आहेत, यात केंद्र सरकारने Specified Skilled Workers या क्षेत्रातील भागीदारीसाठी जपानसोबत केलेल्या कराराचं आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारत व जपान यांच्यातील सहकार्य आणि भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाईल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

त्याचसोबत आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आणि जपानी भाषा अवगत असणारे भारतीय मनुष्यबळ जपानमधील विविध १४ क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पाठवणं सोपं होईल, या संधीचा फायदा देशातील सर्व राज्यातील युवांना समान पद्धतीने मिळावी अशी विनंतीही आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

केंद्रीय कॅबिनेटने भारत आणि जपान यांच्यात कुशल कामगारांच्या भागीदारीसाठी साम्यंजस्य करार करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य आणि भागीदारी असलेली संस्थात्मक यंत्रणा उभी राहील. त्यामुळे भारत आणि जपान यांच्या नागरिकांमधील एकमेकांची संपर्क वाढण्यास मदत होणार आहे.

या करारानुसार भारतातील कुशल कामगारांना जपानमध्ये पाठण्यास सहकार्य मिळेल, जपानमधील १४ विविध क्षेत्रात कौशल्य असणारे भारतीय कामगार काम करतील, ज्यांनी कौशल्य योग्यता प्राप्त करून जपानी भाषेची परीक्षा पास केली आहे. या करारानुसार नर्सिंग देखरेख, इमारतींची साफसफाई, साहित्य प्रक्रिया उद्योग, औद्योगिक मशिनरी उत्पादन उद्योग, उद्योगांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक माहिती, बांधकाम, जहाज बांधणी आणि जहाज संबंधित उद्योग, वाहनांची देखभाल, विमान, तात्पुरते निवास व्यवस्था, शेती, मत्स्यपालिका, खाद्य वस्तू आणि पेय उत्पादन उद्योग, खानपान सेवा उद्योग यासारख्या १४ क्षेत्रातील कुशल भारतीय कामगारांसाठी जपानमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतJapanजपान