भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

By मोरेश्वर येरम | Published: November 25, 2020 05:10 PM2020-11-25T17:10:23+5:302020-11-25T17:29:30+5:30

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं.

Raut can't sleep without criticizing BJP; Chandrakant Patil's counterattack | भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

भाजपवर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नाही; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी दिलं प्रत्युत्तर''राज्यात काही घडलं की त्यामागे भाजपचा हात असल्याची विरोधकांची विचारसरणी''चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांतून साधला सेनेवर निशाणा

मुंबई
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याचं सत्र काही थांबताना दिसत नाहीय. यात भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेकडून संजय राऊत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता राऊत यांच्यावर पलटवार केलाय. ''भाजपवर टीका केल्याशिवाय संजय राऊत यांना झोप देखील लागत नसेल'', असं म्हटलंय. 

भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

संजय राऊत यांनी सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईवरुनही राऊत यांनी ईडीसोबतच भाजपवरही शरसंधान केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर पलटवार केला आहे. 

तुम्हाला ईडीची नोटीस आली का?; हडप्पा, मोहंजोदडोचा संदर्भ देत राऊत म्हणाले...

"राज्यात कोणतीही घटना घडली तर त्यात केवळ भाजपचा हात असतो, अशा विचारसरणीची ही विरोधक मंडळी आहेत. त्यात संजय राऊत यांना भाजपवर टीका केल्याशिवाय झोपदेखील लागत नसेल. स्वत:चा पराभव समोर दिसू लागला की यांचं टीकास्त्र आपोआप सुरू होतं'', असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये मांडलेले मुद्दे...
>> राज्यात काही झालं, पाऊस कमी-जास्त पडला तरी त्यात भाजपचा हात आहे, असं प्रत्येक वेळेस राज्य सरकारला वाटतं
>> संजय राऊतांना भाजपवर दिवसभरातून १० वेळा टिका केल्याशिवाय झोपच लागत नाही. 
>> मला खरं बोलण्याची आणि वस्तुस्थिती मांडण्याची सवय आहे, स्वप्नात रमण्याची नाही! त्यामुळे मी असं म्हटलं की, माझ्यावर वारंवार टीका करुन तुम्हाला शरद पवार मुख्यमंत्री करणार नाही, मुख्यमंत्री करण्याची वएळ आली तर ते सुप्रियाताईला मुख्यमंत्री करतील. 
>> महाराष्ट्राच्या संस्कृतीने देशाला दिशा दिली, तर मग आता महाविकास आघाडी सरकारला कोणाच्या शरीरयष्टीवर, कोणाच्या आडनावावर बोलण्याची संस्कृती आणायची आहे का महाराष्ट्रात?
>> एखाद्या यंत्रणेने राज्य सरकार प्रति अनुकूल काम केले तर ते चांगले पण त्याच यंत्रणेने चौकशी केली आणि त्यांचा त्रास झाला की त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप राज्य सरकार करतं
>> पदवीधर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने जयंत पाटील यांनी पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केली आहे.
>> राज्य सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही ती आमची संस्कृती नाही.

 

Web Title: Raut can't sleep without criticizing BJP; Chandrakant Patil's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.