शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

राज्यसभा खासदार नितीशकुमारांचा नवा राजकीय वारसदार; बिहारच्या राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 4:51 PM

Nitish kumar, Bihar Politics: नितीशकुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळीदेखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली.

पटना : नुकत्याच झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नितीशकुमारांनी मोठी घोषणा केली होती. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नितीशकुमारांनी ही माझी शेवटची निवडणूक म्हणून घोषणा केली होती. यानंतर दीड महिन्यांनी नितीशकुमारांनी त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणा करून टाकली आहे. य़ामुळे पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

नितीशकुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळीदेखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली. हरण्याची चिन्हे दिसू लागताच नितीशकुमारांनी थेट निवृत्तीचेच का़र्ड खेळले. आता त्यांच्यासमोर उत्तराधिकारी शोधण्याचे आव्हान होते. कारण सातव्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीशकुमारांना विरोधकांसह भाजप, स्वपक्षियांकडूनही विचारणा होणार होती. 

भाजपावर नाराज? नितीशकुमार सरकार लवकरच कोसळणार; राजदचा दावा

नितीश कुमार यांचे वारसदार हे त्यांच्याच पक्षाचे दिल्लीत बसणारे राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आहेत. पटनामध्ये जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु होती. तेव्हा अचानक नितीशकुमारांनी आरपीसी यांच्या नावाची घोषणा केल्याने बैठकीतही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नितीशकुमार य़ांनी आरपीसी यांना जदयूचा नवा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व सदस्यांनी होकार दिला.

नितीश 2022 पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष राहू शकत होते. मात्र, त्यांनी मध्येच असा निर्णय का घेतला हे न समजण्यापलिकडचे आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व निर्णय नितीशकुमारांचेच असणार आहेत, फक्त शिक्का आरसीपी सिंहांची असणार आहे. दुसरीकडे या निर्णयामागे भाजपाचे वाढलेले वर्चस्वही बोलले जात आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष असल्याने जर त्यांनी भाजपाबाबत काही कठोर निर्णय घेतला तर आघाडी धर्माच्य मर्यांदांवरून प्रश्न उपस्थित झाले असते. यामुळे नितीश यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरपीसी सिंह नितीश यांच्या जिल्ह्यातीलच नालंदातील आहेत. तसेच ते नितीश यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते आहेत. 

Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने

सरकारवर आधीसारखे नियंत्रण ठेवता येणार?नितीशकुमारांना या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. जदयूचे आमदार घटले असून भाजपाचे आमदार वाढले आहेत. जदयूचे 43 तर भाजपाचे 74 आमदार आहेत. यामुळे मुख्यमंत्री जरी नितीशकुमार झाले तरीही त्या प्रमाणात मंत्रिपदे भाजपाच्याच वाट्याला अधिक जातील. तहामध्ये मोठी मोठी खाती भाजपाकडेच जातील, यामुळे आधीसारखे नियंत्रण ठेवणे त्यांना कठीण जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी जेव्हा त्यांनी राजदसोबत निवडणूक जिंकली होती, तेव्हा काही महिन्यांतच ते त्रस्त झाले होते. 

विरोधकही ताकदवाननितीशकुमारांना यावेळी सहकाऱ्यांसोबत विरोधकही ताकदवान लाभले आहेत. 2005 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून लालूप्रसाद यादव यांचे पतन होत गेले. मात्र, यंदा विरोधात 115 आमदार असणार आहेत. एमआयएमचे पाच आणि राजद आघाडीचे 110. लालू प्रसाद यादव हे तुरुंग आणि हॉस्पिटलमध्ये असल्याने तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जिवावर ७५ आमदाप निवडून आणले आहेत. यामुळे तेजस्वी अनुभवाने कमी असले तरीही नितीसकुमारांना नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न जरूर करणार. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहार