Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर; शरद पवार पक्षाने अजून खाते उघडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:37 IST2026-02-09T10:36:53+5:302026-02-09T10:37:04+5:30

Pune ZP Election Result 2026 अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

Pune ZP Election Result 2026 Ajit's Nationalist Congress Party is in the lead in Pune district; Sharad Pawar's party has not yet opened its account | Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर; शरद पवार पक्षाने अजून खाते उघडले नाही

Pune ZP Election Result 2026: पुणे जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवर; शरद पवार पक्षाने अजून खाते उघडले नाही

पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी आज मतदान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जुने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार की विरोधक सत्तांतर घडवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी ५ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर भाजप २ शिवसेना एक जागेवर आघाडीवर आहे. आजच निकाल लागणार असून दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी शनिवारी (दि. ७) ६८.८९ टक्के मतदान झाले. ही टक्केवारी अंदाजे असून यात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात होते. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी मतदानात सुमारे दीड टक्का घट झाली. गेल्या वेळी ७०.३५ टक्के मतदान झाले होते. शनिवारी झालेल्या मतदानानंतर या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, मतमोजणी सोमवारी (दि. ९) होणार आहे. सर्वाधिक मतदान राजगड तालुक्यात ७९.३० टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात ५४.९० टक्के झाले.

तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी (अंदाजे)

जुन्नर – ६१.१८
आंबेगाव – ६५.३०
शिरूर – ७५.५९
खेड – ७५.४६
मावळ – ७७.४३
मुळशी – ६३.७९
हवेली – ६८.०२
दौंड – ६५.००
पुरंदर – ६८.३७
राजगड (वेल्हा) – ७९.३०
भोर – ७५.६२
बारामती – ५४.९०
इंदापूर – ६५.६७

Web Title : पुणे जिला परिषद चुनाव: अजित पवार की राकांपा आगे; शरद पवार की पार्टी पीछे

Web Summary : पुणे जिला परिषद चुनावों में, अजित पवार की राकांपा 5 सीटों पर आगे है। मतदान प्रतिशत 68.89% रहा। दोपहर तक नतीजे आने की उम्मीद है। राजगढ़ में सबसे अधिक और बारामती में सबसे कम मतदान हुआ।

Web Title : Pune ZP Election: Ajit Pawar's NCP Leads; Sharad Pawar's Party Lags

Web Summary : In Pune ZP elections, Ajit Pawar's NCP leads in 5 seats. Voting percentage was 68.89%. Results are expected by afternoon. Rajgad recorded highest turnout, Baramati the lowest.