शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी, अमित शहा निवडणूक आयोगाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 06:25 IST

रोड शोची माहिती मागविली; राहुल गांधींच्या वक्तव्याचीही घेतली दखल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी अहमदाबाद येथे मंगळवारी मतदान केल्यानंतर शहरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीपमधून मिरवणूक काढल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने गुजरातमधून मागविला आहे. मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर आयोगाने ही माहिती मागविली. त्यामुळे आयोग आता पंतप्रधानांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत भारतीय हवाई दलाचे वर्णन ‘मोदी यांचे हवाई दल’ केले होते. त्याचीही दखल आयोगाने घेतली असून, त्यांच्या भाषणाचीही माहिती आयोगाने मागविली असल्याचे निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर वेळावेळी केलेल्या वक्तव्यांविषयीही निवडणूक आयोगाने माहिती पाठविण्याच्या सूचना संबंधित राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मोदी यांच्या मंगळवारच्या रोड शोविषयी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मतदानाच्या दिवशी मोदी यांची काढलेली मिरवणूक व त्याप्रसंगी त्यांनी केलेले भाषण आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोदी यांना दोन किंवा तीन दिवसांची प्रचारबंदी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली होती. मोदी यांनी लातूरमधील जाहीर सभेत तरुण मतदारांना उद्देशून पुलवामामधील शहिदांसाठी तुम्हाला मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. त्या भाषणाची प्रत आयोगाकडे आली असून, त्याची तपासणी केली जात आहे.ही होती वादग्रस्त वक्तव्येमोदी यांच्याविषयीच्या तक्रारींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाकडून विलंब का होत आहे, असा सवाल केला असता, संदीप सक्सेना म्हणाले की, या सर्व तक्रारी १६ एप्रिलपर्यंत दाखल झाल्या आहेत.निवडणुकांच्या कामांमुळे मोदींच्या भाषणांच्या प्रती मिळण्यास विलंब झाल्याने कारवाईस उशीर होत आहे, असे निवडणूक उपायुक्तांनी सांगितले. हवाई हल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहनही मोदींनी केले होते. शबरीमालावरून डावे व मुस्लीम पक्ष घातक राजकारण खेळत आहेत, असेही मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी