शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनिर्णित जागांचा तिढा महिला दिनाच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 19:03 IST

नगर (दक्षिण) व पुणे लोकसभेच्या जागेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देवाणघेवाण होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे.

ठळक मुद्देअनिर्णित जागांचाही होणार निर्णयपुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या जागेसाठी आग्रहस्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा देणार असल्याची माहिती

पुणे: राज्यातील लोकसभेच्या अनिर्णित जागांसंबधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुंबईत ८ मार्चला वेगवेगळ्या ठिकाणी  होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची बैठक दिल्लीत ९ मार्चला होणार असून तत्पुर्वी प्रदेश शाखेकडून काही वादग्रस्त जागांवरील नावे दिल्लीत पाठवली जातील. त्यातच पुण्याच्या जागेचाही समावेश आहे. नगर (दक्षिण) व पुणे लोकसभेच्या जागेची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देवाणघेवाण होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. पुण्याची काँग्रेसची जागा राष्ट्रवादीला द्यायची व त्या बदल्यात नगर (दक्षिण) ची राष्ट्रवादीकडे असलेली जागा काँग्रेसला द्यायची असा हा प्रकार आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सूजय विखे यांना नगर (दक्षिण) मधून निवडणूक लढवायची आहे तर पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या जागेसाठी आग्रह आहे. मात्र कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात घेऊन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या चचेर्ला आता पूर्णविराम दिला असल्याचे समजते. दोन्ही जागा त्यात्या पक्षांकडेच राहणार असून त्यावर उमेदवार कोण यासंबधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे  नगरचे आमदार अरूण जगताप यांनी नगर (दक्षिण) मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंगळवारी त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली. त्यांचे समर्थकही त्यांच्यासमवेत होते. पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसची अडचण झाली आहे. पक्षाकडून माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड ही दोन नावे केंद्रीय शाखेकडे पाठवली असली तरीही शेतकरी कामगार पक्ष व संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी प्रविण गायकवाड व भाजपाचे सध्याचे सहयोगी खासदार संजय काकडे हेही या जागेवरून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांचा त्यांना विरोध आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या नावांसाठी काँग्रेसवर दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीची बैठक पक्षाध्यक्ष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मार्चला मुंबईत होत आहे. त्यात पक्ष लढवणार असलेल्या सर्व जागांवरचे उमेदवार नक्की केले जातील अशी माहिती मिळाली. राजू शेट्टी यांचा स्वाभीमानी शेतकरी संघटना, जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे आणखी काही पक्ष या दोन्ही प्रमुख पक्षांच्या आघाडीत आहेत. काही पक्ष काँग्रेसकडून तर काही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. एकूण ४८ जागांपैकी दोन्ही प्रमुख पक्षांकडे प्रत्येकी २४ व त्यानंतर त्यांनी त्यांच्या कोट्यातून त्यांच्या घटक पक्षाला जागा द्यायच्या असे सर्वसाधारण सूत्र जागावाटपासंबधी ठरवण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही पक्ष आपापल्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा देणार असल्याची माहिती मिळाली. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना