Pooja Chavan Suicide Case: Sanjay Rathod explained Photo with Pooja Chavan Who is Arun Rathod? | Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणसोबतचा फोटो अन् अरूण राठोड कोण?; संजय राठोडांनी स्पष्ट शब्दात सांगितलं...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणसोबतचा फोटो अन् अरूण राठोड कोण?; संजय राठोडांनी स्पष्ट शब्दात सांगितलं...

ठळक मुद्देमी मागासवर्गीय कुटुंबातून पुढे येऊन बंजारा, ओबीसी समाजाचं नेतृत्व करतोमाझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहेमी या प्रकरणावर जास्त काही बोलणार नाही, पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईल

यवतमाळ – पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात राज्यातील राजकीय वातावरण पेटलेले आहे, पूजाच्या आत्महत्येसाठी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Shivsena Sanjay Rathod) यांच्यावर भाजपाने(BJP) थेट आरोप केले, पूजा चव्हाण आत्महत्येला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला.(Sanjay Rathod first Reaction on Pooja Chavan Suicide Case)  

यातच संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत, पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबद्दल दु:ख आहे, परंतु माझा या घटनेशी कोणताही संबंध नाही, मी मागासवर्गीय कुटुंबातून पुढे येऊन बंजारा, ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो, माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सांगत संजय राठोड यांनी विरोधकांवर निशाणा साधला, यावेळी पत्रकारांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाणसोबत असलेले फोटो व्हायरल होत आहेत, त्याबद्दल विचारणा केली.

"हात जोडून विनंती करतो की..."; पूजा चव्हाण प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड बोलले

पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राठोड म्हणाले की, मी समाजाचं नेतृत्व करतो, लोकांमध्ये असतो, सर्वांना सोबत घेऊन मी काम करत असतो, अनेकदा भेटीवेळी माझ्यासोबत कार्यकर्ते फोटो काढत असतात, त्यामुळे पूजा चव्हाणसोबतचे व्हायरल होत असतील असं त्यांनी म्हटलं, त्याचसोबत अरूण राठोड कोण? याची मला माहिती नाही, मी या प्रकरणावर जास्त काही बोलणार नाही, पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईल, पण हात जोडून विनंती करतो, माझी बदनामी करू नका असं त्यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या, या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोड नावाचा कार्यकर्ता कथित मंत्र्यासोबत बोलत असताना ऐकायला मिळतं, या ऑडिओ क्लिपमध्ये कथित मंत्री पूजा चव्हाणचा मोबाईल काढून घे असे आदेश देताना ऐकायला मिळतं, या सर्व प्रकरणात अरूण राठोड याची महत्त्वाची भूमिका आहे.

कोण आहे अरूण राठोड?

अरूण सुभाष राठोड(Arun Rathod) हा वनविभागात नोकरी आहे, तो बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे कुटुंबासह राहत होता, काही दिवसांपूर्वीच अरूण पूजासोबत पुण्यात राहायला गेला होता. ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडला कथित मंत्र्यांने सूचना दिली होती असं सांगितलं जातं, परंतु हा आवाज संजय राठोड यांचा होता का याबाबत पुष्टी नाहीत, पोलिसांनी या प्रकरणात अरूणची चौकशी सुरू केली आहे, ज्यावेळी पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा अरूण राठोड तिथेच उपस्थित होता, आम्हाला फक्त आवाज ऐकायला आला असं अरूणने पोलिसांना सांगितले.

 कोण आहे पूजा चव्हाण?

पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती

Web Title: Pooja Chavan Suicide Case: Sanjay Rathod explained Photo with Pooja Chavan Who is Arun Rathod?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.