“भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 08:13 PM2021-07-28T20:13:13+5:302021-07-28T20:15:13+5:30

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

pdp mehbuba mufti criticized modi govt and bjp over article 370 | “भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका

“भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत काही फरकत नाही”; मेहबुबा मुफ्तींची टीका

Next

जम्मू: अनुच्छेद रद्द करून जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष दर्जा देण्यात यावा, यासाठी स्थानिक नेते आग्रही असल्याचे दिसत आहेत. तसेच अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, भाजप आणि ईस्ट इंडिया कंपनीत कोणताही फरक नाही, अशी टीका केली आहे. (pdp mehbuba mufti criticized modi govt and bjp over article 370)

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

पाकिस्तानशी पुन्हा एकदा चर्चा करायला हवी. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू व्हायला हवा, असा सल्ला देत पाकिस्तानचे नाव काढल्यावर पंतप्रधान मोदी नाराज का होतात, अशी खोचक विचारणा केली आहे. अनुच्छेद ३७० पाकिस्तान किंवा चीनने दिलेले नाही. ते रद्द करण्याचा निर्णयाच्या फेरविचार करायला हवा, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. 

भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

भाजप ७० वर्ष संघर्ष करू शकते तर आपण का नाही?

भाजप ७० वर्ष संघर्ष करते आणि कलम ३७० बेकायदेशीर आणि असंवैधानिकपणे रद्द करते, तर आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष का करत नाही, अशी विचारणा करत मला लोकांना सांगायचे आहे की, जेव्हा तुम्ही धर्माच्या आधारे भारताची निवड केली, तेव्हा काश्मिरींनी तुमचे समर्थन केले तर बाकीचे पाकिस्तानात गेले. आम्ही त्यावेळी धर्माचे समर्थन केले नाही, आम्ही सरकारी सैन्याचे व बंधुत्वाचे समर्थन केले. मात्र, राज्यघटनेचा भंग करून आज भाजपने जम्मू-काश्मीरचे अस्तित्व संपवले, अशी टीकाही मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. 

मोठी भरती! Paytm देतेय २० हजार तरुणांना नोकरीची संधी; पगार ३५ हजार रुपये, पाहा डिटेल्स

दरम्यान, भाजप आपल्याच देशवासीयांवर संशय घेतला. इस्रायलच्या तंत्रज्ञान वापरत हेरगिरी केली, असा आरोप करत जम्मू-काश्मीरची जनता घटनात्मक, लोकशाहीच्या आणि शांततापूर्ण मार्गांनी लढा देईल. मग तो लढा कितीही महिने किंवा वर्ष चालला तरी चालेल. पण आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू, असा पुनरुच्चार मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.  
 

Web Title: pdp mehbuba mufti criticized modi govt and bjp over article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.