Is Partha Pawar Maratha Reservation Stand against state government? NCP MP Supriya Sule Reaction | मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणावरील पार्थ पवारांची भूमिका राज्य सरकारविरोधी आहे का? खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ठळक मुद्देमराठा आरक्षण असो वा धनगर, मुस्लीम आरक्षण असो या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्याच चारही पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न एका मताने एका विचाराने संसदेत मांडलाएखादा व्यक्ती चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे

मुंबई – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलन पुकारलं, यातच बीड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याने यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांनीही आता उडी घेतली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील पाऊल उचलावे असं सांगत माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

या घटनेनंतर पार्थ पवार पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात गेलेत का? अशीच चर्चा सुरु झाली आहे. पत्रकारांनी याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला, त्यावर त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षण असो वा धनगर, मुस्लीम आरक्षण असो या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी म्हणून आम्ही संसदेत करत असतो. मराठा आरक्षणाबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्याच चारही पक्षाच्या खासदारांनी हा प्रश्न एका मताने एका विचाराने संसदेत मांडला आहे. महाराष्ट्र सरकारही रोज त्याचा फॉलोअप घेऊन समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायेत. धनगर समाजाची मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. धनगर समाजाला न्याय मिळाला यासाठी अनेक वर्ष मी हा मुद्दा लोकसभेत मांडतेय. सर्व समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या.

त्याचसोबत  एखादा व्यक्ती चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, सरकारनेही मराठा समाजाबाबत पुढाकार घेतलाच आहे. त्यात काही गैर नाही असं सांगत सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.

काय म्हणाले होते पार्थ पवार?

मराठा नेत्यांना जागं होण्याची, संघर्ष करण्याची गरज असल्याच पार्थ यांनी म्हटलंय. बीड तालुक्यातील केतूरा गावात १८ वर्षाच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेतील मृत तरुणाचा फोटो आणि त्याने लिहिलेली चिठ्ठी शेअर करत, पार्थ पवार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जागं होण्याचं आवाहन केलंय. विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पीढीचे भविष्य धोक्यात आले आहे. सध्यातरी, मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी या पेटलेल्या मशालीला स्वत:च्या ह्रदयात स्थान देऊन विवेक आणि कोट्यवधी असहाय विवेक यांच्या न्यायासाठी दरवाजे ठोठावणार असल्याचे पार्थ यांनी म्हटले आहे. पार्थ यांनी आपल्या ट्विटर अकांऊंटवरुन सरकारलाही लक्ष्य केलंय.

पार्थ पवारांच्या भूमिकेवरून भाजपाचा ठाकरे सरकारला टोला

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत आक्रमकपणे पुढे यावं, या पार्थ पवार यांच्या मागणीला महाविकास आघाडी गंभीरपणे दखल घेणार की कवडीची किंमत देणार? असा सवाल करत भाजपा आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकार आणि खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.

Web Title: Is Partha Pawar Maratha Reservation Stand against state government? NCP MP Supriya Sule Reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.