Parth Pawar's candidature for MLA? Jayant Patil says ... | पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात...

पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात...

ठळक मुद्देमंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची चर्चापार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रियामंगळवेढाच्या विकासासाठी पार्थ यांना उमेदवारी देण्याचं शरद पवारांना पत्र

कोल्हापुर
मंगळवेढ्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीसाठी आतापासूनच अनेकांची नावं चर्चे आहेत. पार्थ पवार यांनी या जागेवरुन निवडणूक लढवावी अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिल्याची माहिती समोर आली आहे. 

पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता, शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशायाचं पत्र अमरजित पाटील यांनी लिहिलं आहे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामे मार्गी लागतील. त्यामुळे पार्थ पवारांना संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्याबाबत अजून कुठलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्यानं या जागेच्या उमेदवारीबाबत आता सस्पेन्स निर्माण झाला आहे. 
 

Web Title: Parth Pawar's candidature for MLA? Jayant Patil says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.