Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 10:23 AM2021-07-14T10:23:54+5:302021-07-14T10:28:01+5:30

Pankaja munde supporter meeting in mumbai: वरळीत पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते जमले होते.

pankaja munde worli office supporters meeting, case filed against 42 with three organizers | Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्दे माझा नेता मोदी... माझा नेता अमित शाह...


मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. नाराज पदाधिकाऱ्यंची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. कोरोना नियमांना पायदळी तुडव त्या ठिकाणी शेकडो पदाधिकारी जमले होते. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवडी राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचे सूर पसरले आणि 70 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यानंतर पंकजा यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचा विसर पडला. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पण, नंतर सर्वांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

माझा नेता मोदी... माझा नेता अमित शाह...
पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यावेळी, आपण धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करणार जोवर शक्य आहे, असे म्हणत माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व जे पी नड्डा आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे पंकजा यांनी म्हटले आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. आपल्याला काय, मला माझ्यासाठी काही नको. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचे नाव आले, काय बिघडले? मी कोण आहे…? तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका”, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

ते त्यांनाच लखलाभ असो

कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचेच आणि महाभारतही तिकडचेच, ते त्यांनाच लखलाभ असो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे कार्यकर्ते नाराज असल्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील वाद चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा सुरू होती. अलीकडेच पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरणही दिले होते.

 

Web Title: pankaja munde worli office supporters meeting, case filed against 42 with three organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.