शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Pandharpur Election Results Live: "येणारा धोका समजा अन् एक पाऊल पुढे टाका"; भाजपा आमदाराची सत्ताधारी आमदारांना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 4:02 PM

पंढरपूर पोटनिवडणूक २०२१:  पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाची विजयाच्या दिशेने वाटचाल आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे.

ठळक मुद्देपंढरपुर पोट निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले तरीही लोकानी नाकारले. हा महाविकास आघाडीच्या आमदारांना संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका.भाजपा आमदार नितेश राणे यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर दिली प्रतिक्रिया

मुंबई – पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला यश मिळताना दिसत असल्याचं पाहताच विरोधकांनी सत्ताधारी आमदारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूरात समाधान आवताडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अद्याप मतमोजणी पूर्ण होऊन अधिकृत घोषणा बाकी आहे. तत्पूर्वी आवताडेंच्या घराबाहेर जल्लोष सुरू झाला आहे. या निवडणुकीत भाजपानं महाविकास आघाडीला मात दिली आहे.(BJP MLA Nitesh Rane Targted MVA Leaders over Pandharpur by Election Results) 

या निवडणुकीच्या निकालावर आमदार नितेश राणेंनी थेट महाविकासच्या आघाडीच्या आमदारांना खुली ऑफर दिली आहे. नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, पंढरपुर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले तरीही लोकानी नाकारले. हा महाविकास आघाडीच्या आमदारांना संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे असं ते म्हणाले आहेत.

चंदक्रांत पाटलांनीही साधला निशाणा

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.

पंढरपूरात भाजपाचा जल्लोष

भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याने समाधान आवताडे केंद्रावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. भाजपानेही विजय निश्चित मानला असून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. मात्र अद्यापही विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे, पंढरपूर मतमोजणी केंद्रावर संभ्रमावस्था दिसत आहे. 

टॅग्स :Pandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Ajit Pawarअजित पवार