शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

Pandharpur Election: “ज्यांनी घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्याच शरद पवारांच्या घरात टोकाची भांडणं सुरू झाली”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 9:06 AM

आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली.

ठळक मुद्देनियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो. मेंढ्याचे नेतृत्व कधी लांडग्यांकडे नसतेराष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळे गरीब तोंडाचा गृहमंत्री बघतात. त्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी अवस्था अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते. शेवटी दिलीप वळसे पाटील या गरीबाला गृहमंत्रिपद दिलं.

पंढरपूर – आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेवर पोट निवडणूक होत आहे. १७ एप्रिलला याठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली. राष्ट्रवादीनं गोरगरिब समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला अशा शब्दात त्यांनी आरोप केले.(BJP Gopichand Padalkar Target NCP Chief Sharad Pawar in Pandharpur Election Campaigning)  

सभेत गोपीचंद पडळकर म्हणाले की, ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो. मेंढ्याचे नेतृत्व कधी लांडग्यांकडे नसते. राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळे गरीब तोंडाचा गृहमंत्री बघतात. त्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी अवस्था आहे असा टोला त्यांनी लगावला.

तसेच सचिन वाझे(Sachin Vaze) प्रकरणानंतर अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते. शेवटी दिलीप वळसे पाटील या गरीबाला गृहमंत्रिपद दिलं. राज्यात जे लोक सीबीआयला येऊ देणार नाहीत असं म्हणत होते त्याच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आता सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागत आहे असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

सरकार कुणाचंही असो पवारच उपमुख्यमंत्री..

अजित पवार यांना काय झालंय माहीत नाही. परंतु ते अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. माझी शरद पवार यांच्यावरील पीएच.डी. अजून पूर्ण झाली नसली तरी आता मी अजित पवार यांच्यावरही एम. फील करणार आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले की, हेच उपमुख्यमंत्री. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले की हेच उपमुख्यमंत्री. सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री अजित पवारच.. असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी लगावला आहे.

आता मंत्र्यांची पुढे मालिकाच असून कोणाही भ्रष्ट मंत्र्याची सुटका नाही.

राज्यात साखर कारखाने बिकट अवस्थेत आले की ते विकत घ्यायचा सपाटा पवार कुटुंब करीत आहेत. आता त्यांनी आपल्याकडील कारखान्याच्या माहितीची श्वेतपत्रिका काढावी. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही. आता मंत्र्यांची पुढे मालिकाच असून कोणाही भ्रष्ट मंत्र्याची सुटका नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुख