शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

ऑक्सिजन वाद: 'सरकारवर गुन्हा नोंदवायला हवा', केंद्रीय मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:26 PM

Parliament Monsoon Session: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना भारती पवार यांनी वक्तव्य केलं.

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही' असे लिखीत व्यक्तव्य त्यांनी संसदेत केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर गुन्हा दाखल करण्याची  मागणी केली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतदरम्यान संजय राउत म्हणाले, "केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा,"अशी मागणी राऊतांनी केली.    

काय म्हणाल्या डॉ. भारती पवार ?काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का ? त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, "आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत सरकारला अंधळी आणि असंवेदनशील म्हटले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या