शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

“हे तर आमचं ३२ वर्षापूर्वीचं स्वप्न”; योगी सरकारच्या फिल्म सिटी प्रकल्पावर काँग्रेसचा पलटवार

By प्रविण मरगळे | Published: September 20, 2020 5:11 PM

नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये आता पूर्वीसारखी जागा शिल्लक नाही अशा परिस्थितीत खरोखर तिथे प्रकल्प सुरु करणार की भाजपाची फक्त घोषणाबाजी आहे हे पाहावे लागेल असा टोला काँग्रेस नेत्याने लगावला आहे.

ठळक मुद्दे३२ वर्षापूर्वी काँग्रेस सरकारने नोएडामध्ये फिल्मसिटीचा प्रकल्प सुरू केला होता.नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये आता पूर्वीसारखी जागा शिल्लक नाहीयूपीच्या निवडणुकीसाठी आता जास्त काळ नाही, त्यामुळे प्रकल्प अंमलबजावणीची शक्यता नाही

प्रयागराज - यूपीच्या योगी सरकारने राज्यात देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे, पण या घोषणेवरून आता वादही निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेसनं यावरुन राजकारण सुरू केले आहे. यूपीमध्ये फिल्मसिटी प्रकल्प हा काँग्रेसचा असून भाजपा विनाकारण यात घोषणा करुन श्रेय लाटत आहे असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार प्रमोद तिवारी यांनी केला आहे.  

याबाबत प्रमोद तिवारी म्हणाले की, जवळपास ३२ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात वीर बहादुर सिंग यांच्या नेतृत्वात जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा नोएडामध्ये फिल्मसिटीचा प्रकल्प सुरू झाला होता. त्यावेळी तत्कालीन सीएम वीर बहादूर आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत नोएडा येथे झालेल्या समारंभात उपस्थित होते. कॉंग्रेसच्या सरकारमध्ये गेल्यानंतर सपा-बसपा आणि भाजपाने उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केले. परंतु या प्रकल्पाशी संबंधित कॉंग्रेसच्या नावामुळे ते अंमलात आणण्यात काही रस दाखवला नाही असा आरोप केला.

तसेच प्रमोद तिवारी यांच्या म्हणण्यानुसार नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये आता पूर्वीसारखी जागा शिल्लक नाही अशा परिस्थितीत खरोखर तिथे प्रकल्प सुरु करणार की भाजपाची फक्त घोषणाबाजी आहे हे पाहावे लागेल. यूपीच्या निवडणुकीसाठी आता एक वर्ष बाकी आहे. कोणत्याही प्रकल्प अंमलबजावणी करण्यास सरकार सक्षम नाही. भाजपाचे खासदार रवी किशन आणि मनोज तिवारी यांनीही अशी घोषणा केली, पण ती कागदोपत्रीच राहिली असा टोलाही काँग्रेसने लगावला.

चुकीचं केलं असेल तर शिक्षा मिळावी

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावर कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे की, सध्या बॉलीवूडमध्ये जे काही घडत आहे, संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा खराब होत आहे. ही घटना पाच ते सहा वर्ष जुनी असेल तर आता ही गोष्ट का बाहेर काढली जातेय? जर एखाद्याने चूक केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, परंतु यामुळे संपूर्ण उद्योगाची बदनामी होऊ नये.

फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा बिघडली

सुशांत सिंह राजपूत - रिया चक्रवर्ती आणि कंगना रणौतनंतर आता अनुराग कश्यपवरील गंभीर आरोप खूपच धक्कादायक आहेत. या सर्व प्रकरणात दोषींवर कारवाई झाली पाहिजे. लोक चित्रपट कलाकारांना त्यांचा आदर्श मानतात. लाखो कुटुंबाचं पोट इंडस्ट्रीवर चालतं.  अशा परिस्थितीत अंमली पदार्थ आणि लैंगिक शोषणासारख्या गोष्टी इथल्या सन्मानाचा विनाश करणार आहे. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्री विकृत होऊ शकत नाही असंही प्रमोद तिवारी यांनी सांगितले.

कंगनानं केलं योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं कौतुक

योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. उत्तर प्रदेशात एक चांगली फिल्म सिटी तयार केली जाईल. फिल्स सिटीद्वारे निर्मात्यांना पर्याय दिले जातील. कंगनाने योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाच स्वागत केलंय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बदलाची गरज आहे. लोकांचा असा समज आहे की भारतातील टॉप फिल्म इंडस्ट्री हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे. पण असं नाहीये. टॉप पोजिशनवर तेलुगू फिल्म इंडस्ट्री आहे. 'मी योगी आदित्यनात यांच्या या निर्णयाचं स्वागत करते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बदलाची गरज आहे. सर्वातआधी आपल्याला एक अशी मोठी फिल्म इंडस्ट्री  हवी आहे जिला भारतीय फिल्म इंडस्ट्री म्हटलं जाईल. आपण अनेक गोष्टींमध्ये विभागले गेलो आहोत. ज्याचा फायदा हॉलिवूडला मिळतो. एक इंडस्ट्री, पण अनेक फिल्म सिटीज असं तिने म्हटलं आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशbollywoodबॉलिवूड