nilesh Rane attacks shivsena mp vinayak raut over development | शिवसेनेच्या राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का?; निलेश राणेंची टीका

शिवसेनेच्या राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का?; निलेश राणेंची टीका

ठळक मुद्देविनायक राऊत यांच्या टीकेला निलेश राणेंनी दिलं प्रत्युत्तरशिवसेना विकास कामांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावाविनायक राऊतांनी कोकणात बालवाडी देखील आणली नाही, अशी टीका

मुंबई
शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विनायक राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे. ते चिपळूण येथे बोलत होते. 

"कोकणात राणेंनी मेडिकल कॉलेज आणले, उद्योग आणले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. विनायक राऊतांनी बालवाडी तरी आणली का? राऊतांना केवळ आरोप करता येतात. त्यांना त्यासाठीच पाठवलं आहे. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत निवडून आले आहेत", असं निलेश राणे म्हणाले. 

विनायक राऊतांनी केला होता गौप्यस्फोट
नारायाण राणे हे भाजपमध्ये का गेले याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला होता. तत्कालीन काँग्रेसचे व सध्याचे भाजपचे आमदार राणे सुपूत्र नितेश राणे यांनी मुंबईतील एका व्यक्तीला १२ कोटींना फसविल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात धाडणार होते, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. 
 

Web Title: nilesh Rane attacks shivsena mp vinayak raut over development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.