ncp mla rohit pawar tweet for eknath khadse | खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिला अन् रोहित पवारांनी निसर्गाचा 'तो' नियम सांगितला

खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिला अन् रोहित पवारांनी निसर्गाचा 'तो' नियम सांगितला

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खास ट्विट केलं आहे.

"निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते" असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते. WelCome एकनाथ खडसे साहेब!" असं म्हणत रोहित पवार यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं आहे.

महाराष्ट्रातील मोठी राजकीय बातमी; एकनाथ खडसेंचा भाजपाला 'राम-राम', शुक्रवारी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार!

'त्या' क्षणापासून भाजपमध्ये माझा छळ सुरू झाला; खडसेंच्या डोळ्यात दाटून आले अश्रू 

मुंबईत 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.  

“महाराष्ट्रात राजकीय भूकंप! खडसेंसोबत भाजपाचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत"

खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, गेली तीन साडे तीन दशके भाजपामध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवले आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच खडसे यांना मानणारे, त्यांचे पाठिराखे असलेले नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

तुमच्यासोबत किती आमदार, खासदार भाजप सोडणार; एकनाथ खडसेंनी सांगितला आकडा

४० वर्षांनंतर 'नाथाभाऊं'ची भाजपाला सोडचिठ्ठी; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना काय मिळणार?

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरू आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

Web Title: ncp mla rohit pawar tweet for eknath khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.