"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:23 PM2020-09-14T12:23:18+5:302020-09-14T13:05:33+5:30

"बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे."

ncp mla rohit pawar slams bjp over bihar election politics | "बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. "बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले, आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा', 'माझे अंगण,माझे रणांगण' यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

"बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा 'पॅटर्न' कधीच यशस्वी होणार नाही" असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावरून रोहित पवार यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. 

"महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार"

"धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजपा सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं, आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार,खून सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे, मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे."

"पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं"

"महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. बिहार निवडणूक जवळ येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले, आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहार मध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा', 'माझे अंगण, माझे रणांगण' यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा 'पॅटर्न' कधीच यशस्वी होणार नाही" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं

कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे. याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

"कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार", आपचा योगी सरकारवर हल्लाबोल

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

CoronaVirus News : अरे व्वा! 105 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात

"देशात भीतीचं वातावरण, संसदेत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक"

Web Title: ncp mla rohit pawar slams bjp over bihar election politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.