bjp chitra wagh slams maharashtra government on rape case in covid center | "राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

मुंबई - मीरा भाईंदर येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय विवाहितेवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं? राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हे लिहीत असताना आग मस्तकात जातीये, पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय मुलीवर मीराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे" असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

"माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं"

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं. SOP ची मागणी गेली ४ महिने सातत्याने सरकारकडे करतोय. इतर घटनेत तत्परता दाखवणारं सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर उदासीन का? माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पाथरली नजीकच्या कोविड सेंटरला आणि कल्याणमधील केंद्रांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी महिला रुग्णांच्या सुविधा नसल्याने महिला असुरक्षित असून राज्य शासनाने त्यासंदर्भात वेळीच लक्ष घालावे असं म्हटलं होतं. 

"राज्य शासन नेमकं महिलांसाठी करतंय तरी काय?"

कल्याण डोंबिवलीप्रमाणेच राज्यातील कोरोना सेंटरमध्ये महिला रुग्ण सुरक्षित नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्याने राज्य शासनाच्या मुख्य अजेंड्यावर महिला सुरक्षा हा मुद्दा आहे की नाही हा मुख्य सवाल आहे.  कल्याण-डोंबिवलीतील कोरोना सेंटरमध्ये देखील सीसी कॅमेरे नाहीत, महिला सुरक्षा रक्षक नाहीत ही शोकांतिका असून ते योग्य नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. वसई विरारमध्ये देखील अशीच अवस्था असून त्यात तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. केवळ कोविड सेंटर पुरता महिला सुरक्षा हा प्रश्न मर्यादित नसून चार महिन्याचा आढावा घेतला असता ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार झाले आहेत, ते अल्पवयीन मुलींपर्यंत पोहोचले असून राज्य शासन नेमकं महिलांसाठी करतंय तरी काय? छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा हा महाराष्ट्र आहे का? गृहमंत्री, मुख्यमंत्री यासारख्या गंभीर विषयावर गप्प का आहेत? असा सवालही वाघ यांनी केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! 105 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात

"देशात भीतीचं वातावरण, संसदेत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक"

"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

English summary :
bjp chitra wagh slams maharashtra government on rape case in covid center

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp chitra wagh slams maharashtra government on rape case in covid center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.