शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले...

By जयदीप दाभोळकर | Updated: January 14, 2021 15:53 IST

जयंत पाटील यांनी अनेक बाबींवर केली भूमिका स्पष्ट

ठळक मुद्देधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही दिली प्रतिक्रिया

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप तसंच नवाब मलिक यांच्या जावयावर केलेली अटकेची कारवाई तसंच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर भाष्य केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक बाबींवर भूमिका स्पष्ट केली. "कोणीही आरोप केला म्हणून राजीनामा दिला जाईल असं होणार नाही. पण पक्ष स्तरावर याची योग्य चर्चा केली जाईल, धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर त्यांना ब्लॅकमेल केलं जात असेल आणि त्यांचा दोष नसेल तर राजीनाम्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. पक्षांच्या अंतर्गत परिस्थितीचा नक्कीच आढावा घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशीही चर्ता करण्यात येईल आणि तत्थ्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल," असं पाटील म्हणाले.दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर सुरु असलेल्या चर्चांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” सांगत जयंत पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDhananjay Mundeधनंजय मुंडे