शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

“शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का?”; काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 17:27 IST

शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का, असा खोचक सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे.

ठळक मुद्देत्यावेळी नितीन गडकरींनी कधी शिवसेनेवर टीका किंवा आरोप केले नाहीतमहामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका गडकरींनी काढावीकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा खोचक टोला

नागपूर: महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना अलिकडेच पाठविले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का, असा खोचक सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे. (nana patole criticized nitin gadkari over wrote letter to cm uddhav thackeray about national highway)

TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार!

नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप आणि सेनेची युती होती. त्यावेळी नितीन गडकरींनी कधी शिवसेनेवर टीका किंवा आरोप केले नाहीत. आता मात्र ते शिवसेनेवर पत्र लिहून आरोप करत आहेत. महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहे. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी. महामार्गाची कामे झाली पाहिजेत. जर या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल, असे नाना पटोले म्हणाले.

“...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा

हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का?

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण २५ वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हते का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. तसेच महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

Paytm ला मोठा धक्का! IPO रोखा, गंभीर आरोप करत माजी संचालकांची सेबीकडे मागणी

दरम्यान, गडकरींनी लिहिलेल्या पत्राला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत ते खरेच शिवसैनिक आहेत की उगाच आमच्यावर नावाने कुणी बोंबाबोंब करतेय ते बाहेर येईल. परंतु शिवसेनेचा उल्लेख का करता? मुंबई गोवा महामार्ग आम्ही करत नाही पण तिथे काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे ही माणसे तुमच्यासोबत आहेत, तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल खासदार अरविंद सावंत नितीन गडकरींना विचारला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNational Highwayराष्ट्रीय महामार्गBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले