"ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 09:06 AM2020-09-13T09:06:12+5:302020-09-13T09:25:07+5:30

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल

"Mumbai will start collapsing from the day the Thackeray brand collapses."- Sanjay Raut | "ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल"

"ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल"

googlenewsNext
ठळक मुद्देठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतोमुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेना कमालीची आक्रमक झाली आहे. दरम्यान, विकरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल, त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊत यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. त्यात राऊत म्हणाले की, ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.



लॉकडाऊनमध्ये आपापल्या राज्यात गेलेले मजूर पुन्हा एकदा मुंबईत आले आहेत. मुंबई त्यांच्यासाठी सुरक्षित शहर आहे. मुंबईच्या जडणघडणीत या श्रमिकांचे योगदान मोठे आहे. मुंबई मुळची कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी, पाठारे प्रभू वगैरे समाजाची असेल, म्हणजेच मराठी माणसाची असेल. पण तिला धनकनक संपन्न आम्हीच केले. ही घमेंड, अहंकार मुंबईतील शेठ लोकांत तेव्हाही होता. आजदेखील आहेच. हीच घमेंड उतरवण्याचे काम सर्वात आधी शिवसेनेने केले. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात दिल्लीच्या मनात कायम द्वेषभावना राहिली. जो शिवसेनेविरोधात बोलेल तो दिल्लीकरांची लाडकी डार्लिंग होत असतेच. असा टोलाही राऊत यांनी या लेखामधून लगावला आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईसा पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, अशी टीका या लेखातून भाजपाला करण्यात आली.

आज मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचा एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक त्यांच्यामागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे, असा हा कठीण काळ आलाच आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

Web Title: "Mumbai will start collapsing from the day the Thackeray brand collapses."- Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.