शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती?; आमदार नितेश राणेंचं गृहमंत्री अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:52 PM

दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे असं स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडलं आहे.

ठळक मुद्देदिशा सालियनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कुठलीही चौकशी नाहीदिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आमदार नितेश राणेंची रोहन रॉयला सुरक्षा देण्यासाठी केंद्राकडे मागणी

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. ही आत्महत्या नसून त्याची हत्या झाली आहे असा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. यानंतर कोर्टाने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.

या संपूर्ण घडामोडीत भाजपा नेते नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली असं पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर ६ दिवसांनी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या बेडरुममध्ये आढळून आला होता. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज होता. मात्र यानंतर या मृत्यूवर संशयाचे ढग निर्माण झाले. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेले. आता आमदार नितेश राणेंनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण एकमेकांशी लिंक आहे असा दावा केला आहे.

आमदार नितेश राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून म्हटलं आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्येचा तपास सध्या सुरु आहे. यात दिशा सालियनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केली नाही. ज्या दिवशी दिशाचा इमारतीवरुन खाली पडली तेव्हा तिथे रोहन रॉय उपस्थित होता. दिशा खाली पडल्यानंतरही रोहन रॉय २०-२५ मिनिटांनी फ्लॅटमधून खाली आला होता त्यामुळे त्याच्या वागणुकीवर संशय निर्माण होतो.

रोहन रॉयने मुंबई सोडून जावं यासाठी त्याला धमकी देण्यात आली असावी. मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्याला मुंबईत येण्याची भीती वाटत असावी. कोणीतरी या प्रकरणाला रोहन रॉयवर दबाव टाकून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतंय असा दावाही नितेश राणेंनी केला. त्यामुळे रोहन रॉयला केंद्र सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरुन तो मुंबईत आल्यानंतर सुरक्षित राहील. रोहन रॉय हा दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य दुवा आहे. त्याच्या जबाबानंतर अनेक खुलासे बाहेर येतील. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे असं स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडलं आहे.

सीबीआयचा तपासही संशयाच्या दिशेने

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला याचा शोध सीबीआय वेगवेगळ्या अ‍ॅंगलने घेत आहे. सुशांत १४ जूनला आपल्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृत आढळून आला होता. आता या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे ज्यामुळे यात काहीतरी गडबड असण्याचा संशय येत आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार, सुशांतने १३ जूनच्या दुपारपासूनच फोन आणि मेसेजला रिप्लाय दिला नाही. सुशांतची बहीण मीतूने सुद्धा हे आधी सांगितलं होतं की, १४ जूनला सकाळी सुशांतने फोन उचलला नाही.

१३ जूनला लवकर बंद झाले लाइट

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कसा झाला ही बाब अजूनही रहस्य बनून आहे. टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, १३ जूनपासूनच सुशांत मेसेज, कॉल किंवा चॅटला उत्तर देत नव्हता. तसेच सुशांतच्या शेजाऱ्यांनी सांगितले होते की, १३ जूनला त्याच्या घरातील लाइट लवकर बंद केली गेली होते. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही त्याच्या मृत्यूचा वेळ नोंदवला नसल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट

बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं

हा महाराष्ट्र आहे अन् इथं भाषाही आपलीच पाहिजे! ‘मराठी’साठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार

कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी

ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

 

टॅग्स :BJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbai policeमुंबई पोलीसAmit Shahअमित शहा