शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ममतांचे टेंन्शन अजून वाढले, आणखी एका निकटवर्तीयाने नव्या पक्षाची घोषणा करत विरोधात रणशिंग फुंकले

By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2021 9:08 PM

west bengal assembly election 2021: सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे.

ठळक मुद्देबंगालमधील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज आपल्या नव्या पक्षाची केली घोषणा सिद्दीकी यांनी आपल्या पक्षाचे नाव इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) असे ठेवले आहेपीरजादा अब्बास सिद्दीकी हे दीर्घकाळापासून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय राहिले होते

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची चिंता अधिकाधिक वाढत आहे. आधी सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे.ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय आणि बंगालमधील मुस्लिम समुदायावर बऱ्यापैकी प्रभाव असलेले फुरफुरा शरीफ दर्गाचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. सिद्दीकी यांनी आपल्या पक्षाचे नाव इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) असे ठेवले आहे. पीरजादा अब्बास सिद्दीकी हे दीर्घकाळापासून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय राहिले होते. मात्र गेल्या काही काळापासून ते ममतांवर नाराज होते. तसेच उघडपणे तृणमूल काँग्रेसला विरोध करत होते.पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी हल्लीच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर ओवेसी यांनी अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर अब्बास सिद्दीकी यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची तयारी सुरू केली आणि आज नव्या पक्षाची घोषणा केली.नव्या पक्षाची घोषणा करताना सिद्दीकी म्हणाले की, आमचा पक्ष हा भारतातील पहिला खरा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल. तो वंचित वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करेल. स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारे अनेक पक्ष अस्तित्वात आले. मात्र एका वर्गाचा अपवाद वगळता अन्य लोक वंचित राहिले. मुस्लिम आणि मागासवर्गीय मागे पडले आहेत. आमचा उद्देश वंचित वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले.अब्बास सिद्दीकी यांनी या नव्या पक्षाचे अध्यक्षपद त्यांचे भाऊ नौशाद सिद्दीकी यांच्याकडे सोपवले आहे. अब्बास सिद्दीकींच्या या पक्षामुळे ममता आणि तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम व्होटबँकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण