शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Gram Panchayat Election Results: राज्याला २ मुख्यमंत्री देणाऱ्या गावात भाजप सुस्साट; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 7:53 PM

Maharashtra Gram Panchayat Election Results: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपकडून खिंडार; भाजपचं शत प्रतिशत यश

यवतमाळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत यवतमाळमध्ये भारतीय जनता पक्षानं मोठी मुसंडी मारली आहे. काँग्रेसच्या दोन दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात भाजपनं एकतर्फी विजय मिळवला आहे. यवतमाळमधल्या पुसद तालुक्यातील गहुली ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. गहुली हे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दोन दिवंगत मुख्यमंत्र्यांचं गाव असल्यानं हा विजय भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.गहुली ग्रामपंचायतीत बराच काळ राष्ट्रवादीची सत्ता होती. पण यंदा भाजपनं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जबरदस्त धडक दिली. विधान परिषदेतील आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली गहुलीत भाजपनं सरशी साधली आहे. १९४९ पासून गहुलीत बिनविरोध निवडणूक झाल्या. मात्र यंदा भाजपनं राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिला. भाजपनं ७ पैकी ७ जागा जिंकत राष्ट्रवादीला धक्का दिला. भाजपच्या विजयात निलय नाईक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या इंद्रनिल नाईक यांचं आव्हान होतं. इंद्रनिल हे निलय यांचे चुलत बंधू आहेत. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.कोण आहेत निलय नाईक?निलय नाईक यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. जुलै २०१८ मध्ये भाजपनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. निलय नाईक यांनी २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा