शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:31 PM

काँग्रेसकडून मोदींना बोफोर्सवर चर्चा करण्याचं खुलं आव्हान

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधीवर सातत्यानं टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकाँग्रेसनं जोरदार पलटवार केला आहे. भाजपा राफेलवर चर्चा करण्यास तयार असल्यास आम्ही कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटलं आहे. राजीव गांधींना वाजपेयी सरकारनं क्लीन चिट दिली होती, असा दावादेखील खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला. 'तुम्हाला (मोदी सरकारला) बोफोर्सवर चर्चा करायची असेल, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्यासारके भित्रे नाहीत,' असं म्हणत खेरा यांनी राफेलचा संदर्भ दिला. '2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं. त्यावेळी मुकुल रोहतगी अतिरिक्त महाधिवक्ते होते. राजीव गांधींविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं त्यावेळी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर वाजपेयींनी राजीव गांधींविरोधात सर्वोच्च न्यायालयात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या,' असं खेरा यांनी सांगितलं. स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याची टीका त्यांनी केली. 'मोदी आजही त्यांच्या अपयशाला जवाहरलाल नेहरु, राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारांना जबाबदार धरतात. मोदी पाच वर्षात अपयशी ठरले. त्यामुळेच आता राजीव गांधींचं नाव घेऊन ते मूळ मुद्द्यांपासून पळ काढत आहेत,' अशी शब्दांत खेरा यांनी मोदींचा समाचार घेतला. माहिती अधिकाराच्या अंतर्गत वारंवार अर्ज करुनही मोदींच्या परदेश दौऱ्यांची, त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात उपस्थित असलेल्यांची माहिती का दिली जात नाही, असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRafale Dealराफेल डील