मोदींना ना बायको, ना मुलं; त्यांना कुटुंबाचं काय मोल?; शरद पवारांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:51 IST2019-04-16T16:49:31+5:302019-04-16T16:51:11+5:30

मोदींच्या कुटुंबावरील टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर  

lok sabha election He has no wife or children ncp chief Sharad Pawar hits out at PM Narendra Modi | मोदींना ना बायको, ना मुलं; त्यांना कुटुंबाचं काय मोल?; शरद पवारांचा वार

मोदींना ना बायको, ना मुलं; त्यांना कुटुंबाचं काय मोल?; शरद पवारांचा वार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटुंबावरील टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदींना बायको, मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचं मोल कसं करणार?, असा सवाल पवार यांनी विचारला. मोदींनी प्रचारसभेत पवार कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हणत हल्ला चढवला होता. मोदींच्या या विधानावर पवारांनी पलटवार केला. 

'माझ्या घरात मुलगी, पत्नी, नातेवाईक आहेत. आमचं मोदींसारखं नाही. त्यांच्या घरात कोणीच नाही. त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्याचा अनुभव नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कुटुंबात नाक खुपसणं बंद करा, असं मी त्यांना सांगेन,' असं पवार म्हणाले. मोदींनी त्यांच्या महाराष्ट्रातील प्रचारसभेतील राजकारणातील घराणेशाहीवर सडकून टीका केली. त्यावेळी पंतप्रधानांनी पवार कुटुंबावर सर्वाधिक हल्ला चढवला होता. 

मोदींनी केलेल्या टीकेला पवारांनी दुसऱ्यांदा प्रत्युत्तर दिलं. रविवारीदेखील शरद पवारांनी मोदींवर शरसंधान साधलं होतं. 'पंतप्रधान एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे कुटुंब कसं चालतं याची जाणीव त्यांना नाही. मोदी आजकाल सतत माझ्या कुटुंबावर टीका करतात. पण त्यांना कुटुंब काय असतं, याची कल्पना नाही. त्यामुळे त्यांनी नको त्या ठिकाणी नाक खुपसणं बंद करावं,' असं टीकास्त्र पवार यांनी बीडमधील आष्टीत झालेल्या सभेत सोडलं होतं. 
 

Web Title: lok sabha election He has no wife or children ncp chief Sharad Pawar hits out at PM Narendra Modi