शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Lok Sabha Election 2019: मनसेची भूमिका उरणार का फक्त भाषणापुरती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:01 AM

महाआघाडीत स्थान नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीवरून चित्र झाले स्पष्ट

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ईशान्य मुंबई, ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील उमेदवारांचीही नावे आहेत. महाआघाडीतील वाटाघाटीदरम्यान मनसेने यापैकी एखादी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्या जागांवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केल्याने महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की फक्त भाषणे करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधी मतांमधील फूट टाळावी, यासाठी मनसेला आघाडीत घ्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटींमुळे मनसे यंदा आघाडीत सामील होणार अशीच चर्चा होती. त्यातच, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे या चर्चेला बळकटी मिळाली होती. मात्र, काँग्रेसने मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाआघाडीचे घोडे अडले होते. मनसे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. महाआघाडीत केवळ समविचारी पक्षांनाच स्थान असेल, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेकडून अन्य पर्यायांची चाचपणी सुरू होती. थेट महाआघाडीत समाविष्ट होता येत नसेल तर राष्ट्रवादी आणि मनसेने स्वतंत्र गणित जुळवावे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील एखादी जागा सोडावी आणि स्वतंत्रपणे भाजपावर हल्लाबोल करावा, अशीही एक मांडणी करण्यात येत होती. मात्र, आता मनसेने दावा केलेल्या मतदारसंघांवर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्याने तीही आशा मावळल्याचे स्पष्ट झाले आहे.राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठविण्याचे धोरण स्वीकारले आहे. १३व्या वर्धापन दिनाच्या भाषणातही त्यांचा सारा रोख भाजपावरच होता. या वेळी लोकसभा निवडणुकांबाबत मात्र भाष्य करण्याचे त्यांनी टाळले होते. त्यामुळे आता मनसे आपले उमेदवार उतरविणार की फक्त भाजपावर टीकेची झोड उठवित राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.आघाडी, युतीपासून समान अंतर राखणार का?२०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपासोबत युती झालेली नसतानाही मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेला विरोध म्हणून मुंबईत तीन उमेदवारही उभे केले होते. आता आघाडीनेही राज यांना जवळ करण्याचे टाळले आहे. त्यामुळे ते उमेदवार न देताच मोदींविरोधात रान उठविणार की निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अथवा आघाडी, युतीपासून समान अंतर राखत विधानसभेच्या तयारीला लागणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस